शिऊर वरून औरंगाबादला जाणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसला अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी; बस मधील 40 प्रवासी सुखरूप…
(Aurangabad Bus Accident News) काल औरंगाबाद जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला असून किन्हळ फाट्याजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी S.T. बस अचानक पलटी झाली.
सदरील बसमधून 40-45 प्रवासी होते. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रवाशांना किरकोळ जखमा झालेल्या असून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. (Aurangabad Bus Accident News)
असा झाला बसला अपघात?
प्राप्त माहितीनुसार, औरंगाबाद परिवहन मंडळाची बस शिरूरहून औरंगाबादकडे येत असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास पावसामुळे झालेल्या चिखलाने एसटी वाहकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून बस पलटी झाली..
अचानक झालेल्या या अपघाताने बसमधील प्रवासी खूप घाबरले होते. या अपघातात बऱ्याच प्रवाशांना किरकोळ लागले पण सर्व प्रवासी सुखरूप आहेत. (Aurangabad Bus Accident News)