प्लास्टिकच्या पिशव्या पाठोपाठ प्लास्टिकचा थर असलेल्या वस्तूंवर बंदी..

एकल प्लास्टिक (single use) प्लास्टिकच्या वापराबाबत राज्यातील मुख्यमंत्री शिंदे सरकारने अजून एक मोठा निर्णय घेतला असून आता बऱ्याच प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी येणार आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी प्लास्टिक हे अत्यंत घातक आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात माहिती देताना राज्य सरकारने रोज निर्माण होणारा प्लास्टिकचा कचरा कमी करण्याचा यामगाचा हेतू आहे असे स्पष्ट केले.

मोदी सरकारने 1 जुलै 2022 पासून एकल प्लास्टिक (single use) प्लास्टिकवर बंदी घातल्यामुळे महाराष्ट्रात या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र एकल प्लास्टिक (single use) प्लास्टिक बंदी करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीच्या काटेकोर अंमलबजावणीकरीता एक समितीची नेमणूक करण्यात आली होती. या समितीने 7 जुलैच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकॉल उत्पादने अधिसूचना 20218 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानिर्णयानुसार शिंदे सरकारने 15 जुलै रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे प्लास्टिक लेपीत ( plastic Coating) व प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर सुध्दा बंदी घालण्यात आली आहे. या सुधारणेनंतर राज्यात प्लास्टिक लेपीत ( plastic Coating) तसेच प्लॅस्टिक थर (plastic Laminated) असलेल्या पेपर अथवा ॲल्युमिनियम यापासून बनवलेले डीस्पोजेबल डीश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटा, वाटी, कंटेनर इत्यादी एकल वापर (single use) उत्पादनावर यापुढे बंदी असणार आहे. रोजच्या कचऱ्यामधील प्लास्टिकचा केर कचरा कमी करणे हाच एका बंदीमागचा प्रमुख उद्देश आहे.

या वस्तूंवर असणार बंदी

राज्यात सिंगल युज (single use) प्लास्टिकमध्ये कप (cup), प्लेट्स (plets), वाडगा (bowl), चमचे (spoon), कंटेनर (container) इत्यादीं वस्तूंच्या वापरावर सध्या बंदी आहे. मात्र सध्या बाजारात डीश (dish), ग्लास (glass), कप(cup) इ. प्लास्टिक लेप (plastic Coating) असलेले किंवा प्लास्टिक लॅमिनेशन (plastic Laminated) वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर वापर होतच आहेत. या वस्तुंमध्ये सुद्धा प्लास्टिक आहेच. अशा या विघटनास घातक ठरणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे बंदीचे पाऊल उचलण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!