राज ठाकरेंची सभा उधळण्यावर भीम आर्मी ठाम ; कार्यकर्ते औरंगाबादमध्ये दाखल.

औरंगाबाद शहरात आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. राज ठाकरे आज कुणाला टार्गेट करणार? आजच्या सभेत काय बोलणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

आज होणाऱ्या सभेला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी पण ही सभा उधळण्यावर भीम आर्मी ठाम आहे. तर दुसरी कडे “राज ठाकरेंची आजची सभा ऐतिहासिक होईल,” असा विश्वास मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.

भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी राज ठाकरेंची सभा बंद पाडण्याचा इशारा दिला असून राज्यभरातून भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादमध्ये दाखल होत आहेत.

राज ठाकरेंनी पोलीस प्रशासनाने घातलेल्या १६ अटींचे उल्लंघन केलं तर महापुरुषांच्या नावाने घोषणा देऊन सभा बंद पाडण्याचा इशारा भीम आर्मीने दिला होता, त्यामुळे या सभेमुळे निर्माण झालेला हा वाद आणखी काय वळण घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अनेक संघटनांनी या सभेला विरोध दर्शवला आहे तर महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी असे अवाहन राज्य सरकारने केले आहे.

राज ठाकरेंच्या सभेमुळे आज दुपारी 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत औरंगाबादमधील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी 3 हजार कर्मचारी, अधिका-यांचा ताफा मागवण्यात आला आहे. सभेच्या प्रत्येक हालचालींवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे.

Similar Posts