राज ठाकरेंनी दिला पुन्हा इशारा! जर 3 मेपर्यंत भोंगे खाली उतरवले नाही, तर 4 मे पासून…
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे जाहीर सभा संपन्न झाली आहे. या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सभास्थळी पोहोचले होते
राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारवर कडाडून टीका केली. सभा होणार, की नाही होणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र मी कुठेही सभा घेतली तरी ती दुरदर्शनच्या माध्यमातून तुम्ही ती पहिलीच असती ना. मग ही नसती उठाठेव कशाला असा सवाल राज यांनी उपस्थित केला.
दरम्यान राज ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये इतरही मुद्दे असल्यावर लक्ष वेधलं. यावेळी पाणी टंचाईचा मुद्दा असेल किंवा इतरही मुद्दे आहेत.
भोंग्या बद्दल दिला पुन्हा अल्टीमेटम
मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्दावर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पावित्रा घेतला. आज १ तारीख आहे, ३ तारखेला ईद आहे. मला त्यांच्या सणात विष कालवायचे नाही. पण ४ तारखेपासून ऐकणार नाही. जर ३ तारखेपर्यंत भोंगे उतरले नाहीत तर सगळीकडे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजलीच पाहिजे. पोलिसांची परवानगी घ्या आणि हनुमान चालीसा लावा असा आदेशच राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून दिला. विनंती करून समजत नसेल तर आमच्यापुढे दुसरा पर्याय उरत नाही. जर याला तुम्ही धार्मिक प्रश्न बनवत असाल तर त्याला धर्मानेच उत्तर द्यावे लागेल असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. सभेच्या दरम्यान अजानचा आवाज ऐकून राज यांनी पोलिसांना बांग बंद करण्याची विनंती केली.
मी लाऊड भोंग्याच्या विषयाला हात घातला. तो पहिल्यांदा नाही घातला किंवा यावर बोलणारा मी पहिला नाही. पण मी फक्त त्याला पर्याय दिला. जर लाऊड स्पिकर उतरले नाहीत तर आम्ही हनुमान चालीसा म्हणू. मला जातीय तेढ निर्माण करायची नाही. दंगली घडवायच्या नाहीत. हा धार्मिक प्रश्न नाही. सामाजिक प्रश्न आहे. जनतेला त्रास होतो. माझ्याकडे मुस्लिम पत्रकाराने भेटूनही तक्रार केली की लाऊड स्पिकरमुळे आमच्या घरातील लहान मुले झोपू शकत नाहीत असे राज ठाकरे यांनी सांगितले.
जर उत्तर प्रदेशातले लाऊड स्पिकर उतरू शकतात तर महाराष्ट्रातले का नाही? हे सगळे स्पिकर्स अनधिकृत आहेत. औरंगाबादमध्ये ६०० मशिदी आहेत अशी माहिती कळली. इथे बांगेची कॉन्सर्ट चालते का? सगळ्या गोष्टी हिंदूंनीच का सहन करायच्या? तुम्ही मशिदीवर भोंगे वाजवणार, रस्त्यात नमाज पढनार. कोणी अधिकार दिले तुम्हाला? असा सवाल राज ठाकरे यांनी केला
तर तिथंच धरून हाणा: राज ठाकरे यांची सभा सुरू असताना सभेत गर्दीतून काही लोकांनी मागून खर्च्या फेकल्या. त्यावेळी ते भरसभेत म्हणाले की, जर कुणी टाळकी गडबड करायला आली असेल तर त्यांना तिथल्या तिथे हाणा. ही महाराष्ट्र नवनिर्माण सभेची सभा आहे. काही वेडवाकड कराला तर चौरंग करून पाठवले असा ही असा सज्जड दम देखील त्यांनी दिला. त्यानंतर उपस्थित लोकांनी मोठा जल्लोष केला आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी पुढील भाषण सुरू केलं, तसेच या पुढच्या सभा संपुर्ण महाराष्ट्रात होणार आहेत. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात देखील यापुढे सभा होतील, असंही ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर कडाडून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जाती-पातीचं राजकारण सुरू करण्यात आलं. शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरे हे केवळ ब्राह्मण असल्यामुळे शरद पवारांनी त्यांना त्रास दिल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.
प्रत्येक गोष्ट जातीतून बघायची ही राष्ट्रवादी काॅंग्रेसची पद्धत आहे. त्यांच्या एकही सभेत छत्रपती शिवाजी महारांजाचा उल्लेख आला नाही. आता मी बोलायला लागल्यावर खोटे व्हिडीओ काढालायला लागले आहेत. मी नास्तिक बोललेलं पवारांना झोंबलं अन् मग देवाची पुजा करतानाचे फोटो त्यांनी काढले. माझ्या आजोबांची पुस्तकं वाचली आहेत. असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांना त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सभेची सांगता राष्ट्रगीताने झाली..