लालपरी आता नव्या रुपात; ST ची पहिली इलेक्ट्रीक बस ‘शिवाई’ आजपासून धावणार..

प्रदुषण कमी करण्यासाठी वाहन क्षेत्रामधील सर्वाधिक मोठा सार्वजनिक उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये लवकरच पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस शिवाई दाखल होणार आहे.

महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी बिरूद मिरावलेली ‘लालपरी’ म्हणजेच एस-टी बस आज दि. १ जून २०२२ रोजी अमृत-महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. या दिनाचे औचित्य साधून एस-टी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या पहिल्या ‘शिवाई’ या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.

राज ठाकरेंना पुन्हा कोरोनाची लागण, आजची शस्त्रक्रिया पुढे ढकलली.

१ जून, १९४८ रोजी पुणे-अहमदनगर-पुणे या मार्गावर एस-टी महामंडळाची पहिली बस रस्त्यावर धावली होती. या आठवणीच्या सन्मानार्थ एस-टी महामंडळाच्या वतीने दरवर्षी १ जूनला एस-टीचा वर्धापन दिन साजरा केला जातो. औंदा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत-महोत्सवी वर्षात आपली एस-टी सुद्धा अमृत-महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करीत असून हा एक दुग्ध-शर्करा योग आहे, या शब्दात ॲड. परब यांनी आनंद व्यक्त केला.

१ जून १९४८ रोजी बस पुणे-अहमदनगर-पुणे अशी धावल्याच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी, पुणे येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील आवारामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’चा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर शिवाई पुणे-अहमदनगर या मार्गावर धावेल. दरम्यान आज अहमदनगर येथून सुद्धा शिवाई बस पुण्यापर्यंत धावणार आहे.

१ जून १९४८ रोजी अहमदनगर येथून रस्त्यावर धावलेल्या पहिल्या बसचे वाहक श्री लक्ष्मणराव केवटे यांच्या शुभ हस्ते ‘शिवाईला‘ हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे, असेही परब यांनी सांगितले.

शिवाईच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर अमृत-महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्या-निमित्त शिवाजीनगर येथील बालगंधर्व सभागृहामध्ये मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमा दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुरदृष्य-प्रणालीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत, असेही परब म्हणाले.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, परिहवन राज्यमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ तसेच परिवहन आणि बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

‘शिवाई’ची ठळक वैशिष्ट्ये –
१) बसची लांबी १२ मीटर, २) टू बाय टू आसन व्यवस्था, ३) एकूण ४३ आसने, ४) ध्वनी व प्रदुषणविरहीत तसेच वातानुकूलीत गाडी, ५) गाडी ताशी ८० किमी वेगाने धावणार, ६) बॅटरी क्षमता ३२२ के. व्ही.

पाहा व्हिडिओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!