१०वी उत्तीर्णांनो! उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वेत ५६३६ जागा रिक्त; ‘या’ संधीचं करा सोनं..

(Jobs in Maharashtra) Northeast Frontier Railway, Railway Recruitment Cell NFR – RRC ( उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वे ) इथे लवकरच ५६३६ जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Northeast Frontier Railway Apprentice Recruitment) जारी करण्यात आली असून शिकाऊ उमेदवार वेल्डर (G&E), फिटर, सुतार, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, पेंटर, टर्नर, रेफ्रिजरेटर आणि एसी मेकॅनिक, प्लंबर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेसन, लाइनमन, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाली देखभाल या पदांसाठी ही भरती असणार आहे.

पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२२ आहे.

एकूण ५६३६ पदांसाठी भरती

शिकाऊ उमेदवार (Apprentice)

● वेल्डर (G&E), फिटर, सुतार, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, पेंटर, टर्नर, रेफ्रिजरेटर आणि एसी मेकॅनिक, प्लंबर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेसन, लाइनमन, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाली देखभाल.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

• या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यता-प्राप्त मंडळाकडून १०वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (१०+२ परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान ५०% गुणांसह शिक्षण घेतलं असणे आवश्यक.

• नॅशनल कौन्सिलने जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (ITI) असणे आवश्यक आहे.

• नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग/स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग द्वारे जारी केलेले व्यावसायिक प्रशिक्षण किंवा तात्पुरते प्रमाणपत्र.

• तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक.

• उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक.

• तसेच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी-शर्थी पूर्ण केल्या असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क

• खुल्या प्रवर्गासाठी – 100/- रुपये

• SC/ST/PWD/महिलांसाठी – शुल्क नाही.

● ही कागदपत्रे आवश्यक

• Resume (बायोडेटा)

• दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपतत्रे

• शाळा सोडल्याचा दाखला

• जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

• ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

• पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२२

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!