Land Purchase Subsidy | शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी मिळणार 100 टक्के अनुदान, या नवीन योजनेबद्दल जाणून घ्या..

Land Purchase Subsidy

Land Purchase Subsidy: शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! आता शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी अनुदान मिळणार आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार प्रत्येकांसाठी योजना राबवत असते. यामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून शेतकऱ्यांना सरकार प्रोत्साहित करते. या कृषी योजनांचा लाभ घेऊन शेतकरी प्रगती करु शकतात.

Government Scheme शेतकऱ्यांना या योजनेमुळे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होते. शेती करताना शेतकऱ्यांना सरकार आर्थिक मदत करत आहे. मात्र आता जमीन खरेदीसाठी सरकार 100 टक्के अनुदान देणार आहे. या योजनेमुळे जमीन घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. चला तर मग या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.. nabard loan for agricultural land purchase

जमीन खरेदीसाठी मिळणार 100 टक्के अनुदान Land Purchase Subsidy
जमीन खरेदीसाठी आता अनुदान मिळत असल्याने अनेकांचे जमिन घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या योजनेचं नाव ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना’ असं आहे. या योजनेमार्फत जमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

nabard loan for agricultural land purchase या योजनेअंतर्गत भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजूरांना शेतजमीन खरेदीसाठी अनुदान दिले जाते. आता अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेत शासनाने बदल केला आहे. आता ही योजना 100 टक्के अनुदानाची करण्यात आली आहे.

Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran Swabhiman Yojana
विधवा व परित्यक्ता महिलांना या योजनेसाठी स्वतंत्र घटक मानण्यात आला आहे. त्यांना या योजनेचा लाभ प्राधान्याने दिला जाईल. यासाठी 100 टक्के अनुदानावर 4 एकर कोरडवाहू जमीन तसेच 2 एकर बागायती जमीन लाभार्थ्यांस उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 60 वर्षे वयोगटातील असणं आवश्यक आहे. nabard loan for agricultural land purchase

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
1) रेशन कार्डची सत्यप्रत
2) जातीचा दाखला
3) उत्पन्नाचा दाखला
4) रहिवासी दाखला
5) दारिद्रय रेषेचे कार्ड
6) भूमिहीन शेतमजूर असल्याचे तल्याठ्याकडील प्रमाणपत्र
7) विधवा / परित्यक्ता / घटस्फोटीता असल्याचा दाखला पुरावा पतीच्या मृत्युचे प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञालेख
8) इतर जमीन नसल्याबाबत प्रतिज्ञालेख
9) अन्य कागदपत्रे लागल्यास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!