Kapus Bajar Bhav | कापसाला 14 हजार रुपयांचा विक्रमी दर मिळणार का? वाचा बातमी
Kapus Bajar Bhav 2023: कापूस पिकाची मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात सर्वाधिक जास्त शेती होते. तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील या पिकाचे क्षेत्र वाढले आहे. कारण मागील वर्षी 14 हजारापर्यंतचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन ऐवजी कापसाला यंदा प्राधान्य दिल्याचे चित्र दिसून आले. मात्र या हंगामात अजूनपर्यंत कापसाला विक्रमी भाव मिळाला नाही, यामुळे शेतकरी नाराज आहेत.
आता जवळपास मार्च महिना संपत चालला आहे मात्र तरीही कापसाला विक्रमी दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कापूस अजून किती काळ साठवायचा हा मोठा प्रश्न पडला आहे. भाव वाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी घरातच कापसाची साठवणूक करुन ठेवलेली आहे. ‘Kapus Bhav Maharashtra’
मात्र, कापूस साठवणूक केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. Kapus Bajar Bhav कारण साठवणूक केल्याने कापसाचे वजन घटून त्याला कीटकांचा प्रादुर्भाव होत आहे. या कीटकांमुळे शेतकऱ्यांच्या परिवाराच्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे.
कारण या कीटकांमुळे शेतकऱ्यांच्या अंगावर पुरळ सुटत असून खाज सुटत आहे. परंतु, कापसाला चांगला भाव नसल्याने शेतकरी विक्री देखील करु शकत नाही. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे. डिसेंबर महिन्यात कापसाला 9500 रुपयांपर्यंत दर होता. मात्र, सध्या कापसाला फार कमी दर मिळत आहे. kapus market rate today
कापसाचे भाव वाढणार का?
आता शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडला आहे की, कापसाचे भाव वाढणार का? शेतकऱ्यांनो सध्या कापसाला साधारणपणे 8000 रुपयांचा दर मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला असता त्या ठिकाणी कापूस दरात तेजी आली आहे. अशी माहिती विविध मिडिया रिपोर्ट कडून मिळाली आहे.
शेतकऱ्यांनो ही माहिती मिडिया रिपोर्ट नुसार देण्यात आलेली आहे. कापसाचे भाव वाढेल का कमी होईल कोणीच स्पष्टपणे सांगू शकत नाही. कारण बाजारभाव आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आणि आवकचा विचार करुन दर ठरत असतात. ही माहिती एक अंदाज म्हणून आपण लक्षात घ्यावी. आपण आपल्या सोयीनुसार कापसाची विक्री करावी.