Ativrushti Nuksan Bharpai | या 10 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पुन्हा हेक्टरी 36,000 रुपये मदत मिळणार

Ativrushti Nuksan Bharpai
Ativrushti Nuksan Bharpai

Ativrushti Nuksan Bharpai: यंदाच्या हंगामात पावसाने धुमाकूळ घातला. पेरणीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांना बेजार केले. परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्यात पिकांचे मोठे नुकसान केले. ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांनाही भरीव मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता.

जून-जुलैपासून झालेल्या पावसामुळे नुकसानग्रस्त 40 लाख 15 हजार 847 शेतकऱ्यांना सुमारे 4700 कोटींची मदत करण्यात आली आहे. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानीपोटी देखील राज्य सरकारने मदत केली आहे. ativrushti nuksan bharpai list 2023

ऑक्टोबरमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. शेतकऱ्यांना लवकरात नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करावी, असा आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता.

शेतकऱ्यांसाठी पुन्हा आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा नुकसान भरपाई दिली जाणार आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे. ativrushti nuksan bharpai list 2023 maharashtra

मार्च 2023 या महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 1286 कोटी 74 लाख 66 हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी राज्यातील 10 जिल्ह्यासाठी मंजूर केला आहे. Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2023

पुणे आणि औरंगाबाद विभागीय आयुक्त यांच्यामार्फत निधी वितरित करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार छ. संभाजीनगर विभागातील छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि लातूर तर पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे. Nuksan Bharpai List 2023 Maharashtra

शेतकऱ्यांना हेक्टरी एवढी मदत मिळणार
शासन निर्णयानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीपोटी 13,600 प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेत, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 27 हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत, तर बहुवार्षिक पिकांसाठी 36 हजार रूपये मदत देण्यात येणार आहे.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!