कोरोना महामारीच्या काळात रुग्णांकडून उकळलेले अतिरिक्त शुल्क तेरा दवाखान्यांनी केले परत तर एकाचा परवाना रद्द.

कोरोना महामारीमध्ये मनपाकडे उपचार करण्याकरिता बेड उपलब्ध नसल्यामुळे शासन आदेशाप्रमाणे औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष परवानगी देण्यात आली होती. मात्र ज्या रुग्णालयांनी उपचारासाठी परवानगी घेतली त्या रुग्णालयांनी रुग्णांकडून बिलाच्या नावाखाली किती पैसे घेतले याची चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आली होती.

त्या चौकशीमध्ये शहरातील 27 रुग्णांची यादी मनपा आरोग्य विभागास प्राप्त झाली होती. बिलांची जाच पडताळणी करण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती गठित करण्यात आली होती. तपासणीनंतर 14 रुग्णालयांनी वसूल केलेले जास्तीचे पैसे परत करावेत, अशी नोटीस बजावण्यात आली होती. त्यापैकी 13 रुग्णालयांनी वसूल केलेले जास्तीचे बिल 21 लाख 75 हजार रुपये परत सुद्धा केले.

आणि ज्या रुग्णालयांनी ती रक्कम परत केली नाही, अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने मनपाला दिले हाेते. त्यानुसार औरंगाबाद शहरातील रोकडीया हनुमान कॉलनी येथील कृष्णा हॉस्पिटल ॲण्ड ICU ने एकाही रुग्णाची रक्कम परत केलेली नसल्यामुळे शुक्रवारी कृष्णा हॉस्पिटलचे नर्सिंग होम प्रमाणपत्र निलंबित केले आसल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!