Police Bharti Maharashtra | राज्यात 14956 जागांसाठी पोलिस भरती, या तारखेला सुरू होणार ऑनलाईन अर्ज..

Police Bharti Maharashtra

Police Bharti Maharashtra: पोलिस भरतीची तयारी करीत असलेल्या तरुणांसाठी खुशखबर! राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली. राज्याच्या पोलिस दलात बंपर पदभरती होणार आहे. कित्येक महिन्यांपासून अनेकांचे डोळे पोलिस भरतीकडे लागले होते. मात्र, आता पोलिस भरतीची प्रतिक्षा संपण्याच्या मार्गावर आली आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माहितीनुसार, येत्या 1 नोव्हेंबरला पोलिस दलात 20 हजार जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यात पोलिस भरती झालेली नाही. अखेर प्रतीक्षा संपली असून, फडणवीस यांनी पोलिस भरतीची घोषणा केली. (Police Bharti 2022 Maharashtra)

Police Bharti 2022 उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लवकरच पोलिस दलातील 20 हजार जागांसाठी भरती केली जाणार असल्याचे जाहीर केले. या नोकर भरती प्रक्रियेची जाहिरात 1 नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जाणार आहे. (Police Bharti Update)

मुंबई पोलिस दलात 6740 जागा, तर संपूर्ण राज्यात 14,956 पोलिस शिपाई जागा रिक्त आहेत. त्यात खुल्या प्रवर्गात 5468 पदांचा समावेश आहे. पोलिस भरतीसाठी एक तारखेला जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध होईल. 3 ते 30 नोव्हेंबरदरम्यान अर्ज प्रक्रिया राहिलं.

Police Bharti 1 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीत कोणत्या जिल्ह्यात किती जागांसाठी भरती होणार, कोणती पदे असणार याबाबत तरुणांना उत्सुकता लागली आहे. मात्र, सध्या जिल्हानिहाय पोलिस दलात किती जागा रिक्त आहे, याबाबतची माहिती समोर आलेली आहे. (Police Bharti Date)

पोलिस भरती विभागनिहाय जागा
मुंबई – 6740 जागा
ठाणे शहर – 521 जागा
पुणे शहर – 720 जागा
पिंपरी चिंचवड – 216 जागा
मिरा भाईंदर – 986 जागा
नागपूर शहर – 308 जागा
नवी मुंबई – 204 जागा
अमरावती शहर – 20 जागा
सोलापूर शहर – 98 जागा
लोहमार्ग मुंबई – 620 जागा
ठाणे ग्रामीण – 68 जागा
रायगड – 272 जागा
पालघर – 211 जागा
सिंधुदुर्ग – 99 जागा
रत्नागिरी – 131 जागा
नाशिक ग्रामीण – 454 जागा
अहमदनगर – 129 जागा
धुळे – 42 जागा
कोल्हापूर – 24 जागा
पुणे ग्रामीण – 579 जागा
सातारा – 145 जागा
सोलापूर ग्रामीण – 26 जागा
औरंगाबाद ग्रामीण – 39 जागा
नांदेड – 155 जागा
अकोला – 327 जागा
बुलढाणा – 51 जागा
यवतमाळ – 244 जागा
भंडारा – 61 जागा
चंद्रपूर – 194 जागा
वर्धा – 90 जागा
गडचिरोली – 348 जागा
गोंदिया – 172 जागा
अमरावती ग्रामीण – 156 जागा


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!