पोलिस भरतीच्या पद्धतीमाध्ये मोठा बदल, ठाकरे सरकारने घेतला महत्वाचा निर्णय..!

महाराष्ट्रातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. राज्याच्या गृह विभागामध्ये 49,500 पदे रिक्त असून, त्याकरिता 2 टप्प्यांमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जुलै अथवा ऑगस्टमध्ये पहिल्या टप्पा होणार असून, त्यामध्ये 7 हजार 231 पदांसाठी पोलिस भरती केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

आधी होणार मैदानी चाचणी.

आगामी पोलिस भरतीआधी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ग्रामीण भागामधील तरुणांना पोलिस भरतीमध्ये जास्त संधी मिळावी, यासाठी राज्य सरकारने भरती पद्धतीमध्ये महत्वाचा बदल केला आहे. त्यानुसार, या भरतीकरिता आधी मैदानी चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येणाऱ्या भरतीपासूनच सुरू केली जाणार आहे.

पोलिस भरतीकरीता आधी लेखी परीक्षा होत होती. मात्र, आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून आता सर्वात पाहिले मैदानी चाचणी होणार आहे. तसेच या पोलिस भरतीमध्ये ग्रामीण भागातील तरुणांना जास्तीत जास्त संधी मिळावी, या उद्देशाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

पोलिस भरतीबाबत महत्वाचे..

▪️राज्याच्या गृह विभागात तब्बल 49 हजार 500 पदे रिक्त आहे.
▪️पहिल्या टप्प्यात 2020 मधील 7 हजार 231 पदांची भरती होणार
▪️पुढील टप्प्यात 2021 व 2022 मधील रिक्त पदांकरीता एकत्रित भरती केली जा आहे.
▪️गृह विभागाने नाईक पद रद्द केले असून पोलिस नाईक आता हवालदार होणार आहे.

खरं सांगायचं तर राज्याच्या गृह विभागाने दोन वर्षांपूर्वीच पोलिस भरतीचे नियोजन केलेले होते. मात्र, राज्यसह जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ही भरती प्रक्रिया रखडलेली होती. राज्याच्या गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातसुद्धा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यात लवकरच पोलिस भरती केली जाणार असल्याचे जाहीर केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!