Kharip pik vima update 2022: खरीप पिक-विमा उर्वरित पिक विमा ‘या’ दिवसापासून खात्यात यायला सुरुवात.

Kharip pik vima update 2022: खरीप पिक-विमा उर्वरित पिक विमा ‘या’ दिवसापासून खात्यात यायला सुरुवात.

Kharip pik vima update 2023: नमस्कार शेतकरी बंधूंनो, खरीप पिक विमा कधी मिळणार याची एक नवीन अपडेट आली आहे पिक विमा कंपन्याकडून 31 मे पर्यंत पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम वाटप करण्यात येईल अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातर्फे देण्यात आली आहे. खरीप हंगामात पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून 31 मे पर्यंत नुकसान भरपाईची रक्कम वाटप करण्यात येईल. याबाबत कारवाई करण्यास कोणतीही कसूर केल्यास विमा कंपनीवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

कृषीमंत्री सत्तार यांनी पिक विमा योजने संदर्भात आकडेवारी सभागृहासमोर मांडली प्रधानमंत्री पिक विमा योजना 2022 मध्ये राज्यातील तब्बल 57 लाख 64 हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आलेले असून एकूण 63 लाख 40 हजार लाभार्थ्यांना 2822 कोटी रुपयांची नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली आहे.

त्यापैकी 2305 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे उर्वरित नुकसान भरपाई वाटप सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.नैसर्गिक Kharip pik vima update 2023 आपत्तीमुळे झालेल्या नुकसानी पोटी 1675 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप करण्यात आल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.

आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांना पिक-विमा मिळाला नव्हता त्यांना भारतीय विमा आय सी आय कंपनी, जनरल लोभा इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया कंपनी आणि बजाज आलियांस कंपन्यातर्फे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर पिक विमा जमा करण्यात येईल म्हणजेच जी उर्वरित रक्कम आहे ती ज्या शेतकऱ्यांना मिळाली नाही त्यांना आता येणाऱ्या 31 मे पर्यंत पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!