Lands Records : जुन्यात जुने सातबारा, फेरफार आणि जमिनीचे खाते उतारे मोफत डाऊनलोड करा तुमच्या मोबाईलवर

Lands Records : सध्याच्या काळात जमीनीची खरेदी करायची असल्यास त्या जमिनीसंदर्भाचा जुना इतिहास माहीत असणे अत्यंत आवश्यक असते; नसता नंतर लाखो रुपये देऊन खरेदी केलेल्या जमिनीबाबत कोर्ट-कचेऱ्यांची वारी करावी लागते. त्यामुळे खरेदीपूर्वी मूळ जमीनीचे मालक कोण होते, त्यामध्ये वेळोवेळी काय काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती असावी लागते. यासाठी जून्यात जुने फेरफार, सातबारा आणि खाते उतारे पहावे लागतात. पूर्वीच्या काळात ही कागदपत्रे व जमिनीचा पूर्व इतिहास मिळवण्यात अडचणी बऱ्याच येत असे, पण सध्याच्या डिजिटल युगात हे चुटकी सरशी शक्य झाले आहे..

Lands Records

सदरची संपूर्ण माहिती जसे की सातबारा, फेरफार, खाते-उतारे संबंधित तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहेत. आता ही संपूर्ण माहिती सरकार तर्फे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. सरकारच्या अधिकृत पोर्टलवर गेल्यावर आपल्याला जमिनी संबंधीची आवश्यक ती संपूर्ण माहिती मिळणे अगदी सोपी झाल्याने अनेकांची तहसील व भूमी अभिलेख कार्यालयांची वारी थांबणार आहे. Lands Records

सातबारा, जुने फेरफार आणि खाते उतारे पाहण्यासाठी

➡️➡️ येथे क्लिक करा ⬅️⬅️

Lands Records Info : सरकारच्या या वेबसाईटवर असे पाहा 1880 पासूनचे जुने अभिलेख :-

  • सर्व प्रथम तुमच्या मोबाइलच्या ब्राऊजर मध्ये aapleabhilekh.mahabhumi.gov.in सर्च करा.
  • नंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
  • या पेजवर ई-रेकॉर्डस् पाहण्याकरिता e-Records (Archived Documents) या पर्यायावर केल्यावर “महाराष्ट्र शासन – महसूल विभाग’चे अधिकृत पेज ओपन येईल.
  • त्यामध्ये उजवीकडे ‘भाषा’ या पर्यायावर क्लिक करून भाषेची निवड करा.
  • त्यानंतर डाव्या बाजूच्या चौकटीत “लॉग-इन’ आणि ‘मदत’ असा ऑप्शन येईल. जर तुम्ही त्या वेबसाईटवर नोंदणी केलेली असल्यास लॉग इन आयडी व पासवर्ड वापरून साईटवर जाऊ शकता. \
  • नोंदणी केली नसेल “नवीन वापरकर्ता नोंदणी’ यावर क्लिक करा
  • त्यानंतर या पेजवर तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरा जसे की, तुमचे नाव, वडिलांचे/पतीचे नाव, आडनाव, लिंग, राष्ट्रीयत्व, मोबाईल नंबर ई. माहिती सविस्तर भरा.
  • त्यानंतर तुमचा व्यवसाय, ई मेल आयडी, DOB ही वैयक्तिक माहिती भरल्यावर सविस्तर पत्त्याविषयीचे रकाने भरा.
    यानंतर लॉग-इन आयडी वेबसाईटच्या निर्देशाप्रमाणे लॉग इन आयडी तयार करून वेबसाईटच्या निर्देशानुसार पासवर्ड तयार करा.
  • नंतर एका चौकटीमधील कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर द्यावे.
  • नंतर पुढील चौकटीमध्ये दिलेली अक्षरे म्हणजेच Captcha कोड जसेच्या तसे चौकटीमध्ये टाईप करुन शेवटी सबमिट बटण वर क्लिक करा.
  • त्यानंतर मोबाइलच्या स्क्रीनवर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली यावर क्लिक करून लॉग-इन करण्यासाठी, मॅसेज आल्यावर “इथे क्लिक करा’वर क्लिक करा.
  • पुढे रेजिस्ट्रेशन करत असताना टाकलेले युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.

असा पाहा फेरफार उतारा…

  • अधिकृत वेबसाईटवर सात जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा निवडून नंतर तालुका, त्यानंतर तुमच्या गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार, फेरफार उतारा, सातबारा, आठ-अ असे पर्याय निवडा. या वेबसाईटवर जवळपास 58 प्रकारच्या अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत.
  • नंतर गट नंबर टाकून ‘शोध’ या पर्यायावर क्लिक करा.
  • नंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट नंबरही संबंधित फेरफाराची संपूर्ण माहिती दिसते.
  • त्यावर फेरफाराचं वर्ष, क्रमांक लिहलेला असतो. त्यावर क्लिक करून त्या वर्षाचा फेरफार पाहू शकता.
  • नंतर पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचं कार्ट ओपन होईल. त्याखाली “पुढे जा’ या पर्यायावर क्लिक केल्यावर “डाउनलोड सारांश’ हा पेज ओपन होईल.
  • या पेजवर ” तुमच्या फाइलची सद्य:स्थिती उपलब्ध आहे’ असे दिसून येईल.
  • त्यासमोरील “फाइल पाहा’ या पर्यायावर क्लिक केल्यावर फेरफार पत्रक ओपन होईल.

सातबारा, जुने फेरफार आणि खाते उतारे पाहण्यासाठी

➡️➡️ येथे क्लिक करा ⬅️⬅️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!