Mudra Loan Scheme: कोणत्याही हमीशिवाय १० लाखांपर्यंत कर्ज मिळणार शिवाय जोखीमही शून्य; व्यवसाय करायचा असल्यास सरकारची ही योजना करणार मदत

Mudra Loan Scheme : जर तुम्हाला स्वतःचा कोणताही व्यवसाय सुरू करायचा असल्यास त्यासाठी पैशांची आवश्यकता असेल तर बरेच जण बँकेकडून कर्ज घेतात. बँकेकडून कर्ज घेताना जास्तीत जास्त कागदपत्रांबरोबरच तुम्हाला जास्तीचे व्याजदेखील द्यावे लागते.

Mudra Loan

आणि सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर कर्जाची हमी म्हणून काहीतरी गहाण ठेवावे लागते. पण जर तुम्हाला कोणत्याही हमीशिवाय अत्यंत कमी व्याजासह आणि जोखीममुक्त कर्ज पाहिजे असल्यास, तुम्ही सरकारी योजना म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकता. योजना ही केंद्र सरकारची असून ज्याचा फायदा घेऊन तुम्हीदेखील तुमचा व्यवसायाला उभारी देऊ शकता.

एप्रिल २०१५ मध्ये केंद्र सरकारने मुद्रा कर्ज योजनेची सुरूवात केली. या योजनेंतर्गत कर्जाच्या ३ श्रेणी पडलेल्या आहेत. पहिली श्रेणी- शिशु कर्ज योजना, दुसरी श्रेणी – किशोर कर्ज आणि तिसरी श्रेणी म्हणजे तरुण कर्ज योजना आहे. या तिन्ही श्रेणी अंतर्गत सरकार तर्फे व्यवसाय सुरू करण्यासाठी ५० हजार रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येते. कोणताही व्यावसायिक जी की भारतीय नागरिक आहे आणि ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे तो PM Mudra Yojna अंतर्गत कर्ज घेऊ शकतो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे कर्ज घेताना कोणतीही प्रक्रिया शुल्क देण्याची आवश्यकता नसते. शिवाय कोणत्याही प्रकारची हमी सुद्धा द्यावी लागत नाही.

Mudra Loan Scheme अंतर्गत तुम्हाला किती कर्ज मिळेल?

शिशू कर्ज: ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज शिशू कर्ज अंतर्गत दिले जा
किशोर कर्ज: किशोर कर्ज अंतर्गत ५०,००० हजार ते ५,००,००० रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
तरुण कर्ज: तरुण कर्ज अंतर्गत ५,००,००० ते १०,००,००० रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

Mudra Loan परतफेड करण्याचा कालावधी ?

प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत तुम्ही घेतलेल्या कर्जाची परतफेड ३ ते ५ वर्षे म्हणजेच ३६ महिने ते ६० महिन्यांमध्ये करावी लागते.

कर्ज घेण्यासाठी पात्रता काय?
भारतात राहणाऱ्या २४ ते ७० वर्षे वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला प्रधानमंत्री मुद्रा कर्जासाठी अर्ज करू शकते. यासाठी तुमच्याकडे असलेल्या मुख्य कागदपत्रे जसे की तुमचे आधार कार्ड, तुमचे पासपोर्ट, तुमचे पॅन कार्ड, केवायसी प्रमाणपत्र आणि मतदार ओळखपत्र यांची आवश्यकता असते.

मुद्रा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची हमी मायक्रो युनिट्ससाठी (CGFMU) क्रेडिट गॅरंटी अंतर्गत देण्यात येते, जी राष्ट्रीय क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी (NCGTC) द्वारे प्रदान करण्यात येते. गॅरंटी कव्हर ५ हे वर्षांकरिता उपलब्ध आहे आणि म्हणूनच मुद्रा योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या परफेडीचा कमाल कालावधी ६० महिने म्हणजेच ५ वर्षे आहे.

Mudra Loan कसे मिळवायचे?

  • सर्वप्रथम https://www.mudra.org.in/ या अधिकृत वेबसाइटवर कर्जासाठी लागणारा अर्ज डाऊनलोड करा.
  • लक्षात ठेवा, शिशू कर्जासाठी लागणारा फॉर्म वेगळा आहे, तर तरुण आणि किशोर कर्जासाठी लागणारा फॉर्म एकच आहे.
  • डाऊनलोड केलेल्या त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती स्पष्टपणे भरा. जसे की, तुमचा आधारला लिंक असेल्ला मोबाईल नंबर, तुमचा आधार नंबर, तुमचे नाव आणि राहण्याचा पत्ता इत्यादी द्या.
  • नंतर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा तपशील जसे की व्यवसाय कुठे सुरू करायचा, व्यवसायाचा प्रकार याची माहिती द्या.
  • OBC किंवा SC/ST प्रवर्गांतर्गत कर्ज घेण्यासाठी येणाऱ्या अर्जदारांना त्यांच्या जातीचा प्रमाणपत्राचा पुरावा म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट द्या.
  • नंतर २ पासपोर्ट फोटो द्या.
  • फॉर्म भरल्यावर कोणत्याही सार्वजनिक अथवा खासगी बँकेत जाउन आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करा.
  • बँकेचे शाखा व्यवस्थापक म्हणजेच मॅनेजर तुमच्याकडून घेतलेल्या माहितीच्या आधारावर PMMY तुम्हाला कर्ज मंजूर करते.

1880 पासूनचे सात बारा, फेरफार नक्कल तुमच्या मोबाईल वर मोफत डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!