Land Map | गावातील 1 नाही 2 नाही तर पूर्ण जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा; ते सुद्धा अवघ्या काही सेकंदातच..

Land map भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. आपल्या भारत देशात शेत जमिनी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे से मानण्यात येते. याशिवाय जमिनीची खरेदी विक्री करणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. त्यामुळेच तर जमिनीचे कोणतेही व्यवहार करताना डिजिटलायझेशन करणे अत्यंत आवश्यक होते. आणि त्यासाठीच केंद्र शासनाने ई- नकाशा म्हणजेच Land map हा एक महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला. आता ऑनलाईन प्रकारे जमिनीची माहिती मिळवत असताना आपल्याला ई-नकाशा प्रकल्पाबद्दल देखील जाणून घेणे अपेक्षित आणि गरजेचे आहे.

Land map

ई-नकाशा प्रकल्प म्हणजे काय? What is Land Map

ग्रामीण पातळीवर जमिनीच्या हद्दी नियमित करण्याकरिता शासनातर्फे भूमि अभिलेख विभाग काम करीत असतो. या विभागाच्या तालुका स्तरावर असलेल्या कार्यालयामध्ये विविध प्रकारचे नकाशे ठेवलेले असतात. या नकाशांच्याच आधारावर कोणत्याही जमिनीच्या हद्दी कायम करण्याचा निर्णय घेण्यात येतो, आणि त्यामुळेच तर हे नकाशे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

दि. 20 मार्च 2011 ला ई-नकाशा प्रकल्प व्यवस्थापन संस्था स्थापन करण्याकरिता शासन निर्णय तयार करण्यात आला आणि त्यानंतर दि. 31 नोव्हेंबर 2012 रोजी शासनाने जारी केलेय निर्णयाप्रमाणे “महाभूमी-प्रकल्प व्यवस्थापन संस्था, तसेच राष्ट्रीय भूमी आधुनिककरण (NLRMP), महाराष्ट्र राज्य” असे नामकरण केले. त्यानंतर काही कालांतराने या नावात डिजिटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम (DILRMP) अशी सुधारणा करण्यात आली होती.

एकात्मिक भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम – National Land Record Modernisation- NLRMP असे नाव देण्यात आलेले असून भूमी अभिलेख व्यवस्थापनाकरिता अत्याधुनिक, सर्वसमावेशक आणि पारदर्शक प्रणालीची निर्मिती करणे ज्यामुळे जमीन मालकी हक्काचे निर्णय बरोबरच संपूर्ण भूमी अभिलेखांचे संगणकी-करण आणि महसूल प्रशासनाचे बळकटीकरण बरोबरच भूमि अभिलेखांचे अद्यावतीकरण करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला. Land Map

1880 पासूनच्या सर्व जमिनीचे सातबारा उतारे पाहण्यासाठी क्लिक करा.

आता शेतीच्या कामासाठी अथवा जमीनीची खरेदी-विक्री प्रकल्पात जमिनीचे आराखडे म्हणजेच Land Map पाहण्याची गरज भासते. अशावेळेस सर्वच नागरिकांना त्यांच्या हातातील मोबाईल किंवा कंप्युटरवर त्यांच्या नावे असलेल्या जमीनीचा नकाशा म्हणजेच land map पाहता यावे म्हणूनच केंद्र सरकारने ई-नकाशा प्रकल्प सुरु केलेला आहे.

ही झाली या बद्दलची सखोल माहिती, चला आता जाणून घ्या की तुम्हाला तुमच्या गावातील तुमच्या स्वतःच्या जमिनीचा नकाशा म्हणजेच Land Map ऑनलाईन पद्धतीने कसा पाहता/डाऊनलोड करता येईल.

गावचा किंवा जमिनीचा नकाशा म्हणजेच Land map मोबाईलवर पाहण्यासाठी पुढील पद्धतीच्या स्टेप करा.

सर्वप्रथम mahabhunakasha.mahabhumi.gov.in या वेसाईटवर क्लिक करा.
वरील लिंक उघडल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल, त्या पेजच्या डाव्या बाजुस Location (स्थान) हा कॉलम दिसेल, त्याकॉलममध्ये राज्य category मध्ये urban आणि rural असे दोन पर्याय दिसतील.

जर तुम्ही शहरामध्ये राहत असल्यास urban हा पर्याय आणि ग्रामिण भागामध्ये राहत असाल तर Rural हा पर्याय निवडावा.
नंतर तुमच्या जिल्ह्याचे नाव नंतर तालुका आणि नंतर गावाचा पर्याय निवडावा.
त्यानंतर Village map या पर्यायावर क्लिक करा.

Village map या पर्यायावर क्लिक केल्यानंतर search by plot number कॉलम दिलेला असून या कॉलममध्ये तुम्हाला हव्या असलेल्या जमिनीचा गट अथवा खसरा क्रमांक टाकून सर्चवर क्लिक केल्यास तुम्ही गट किंवा खासरा क्रमांक टाकलेल्या जमिनीचा समुर्न नकाशा तुमच्या मोबाईल/कॉम्प्युटरचा स्क्रिनवर दिसतो.
आणि या साध्या आणि सोप्या पद्धतीने jaminicha nakasha मोबाईलवर online तुम्हाला पाहता येतो.

जमिन म्हणजेच स्थावर मालमत्तेची खरेदी – विक्री करत असताना त्या मालमत्तेचा संपूर्ण इतिहास जसे की Land map शेत-जमिनीतून रस्ता कोठे आहे, तसेच आपण खरेदी करत असलेली संबंधित जमिनीची हद्द नेमकी कुठेपर्यंत आहे या सर्व बाबतीत त्या जागेचा नकाशा पहावा गरजेचं असतो. आणि त्यामुळेच या गोष्टी तुम्ही वरील पद्धितीणे विनाशुल्क, घरबसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर ई-नकाशा पाहू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!