Land record : 1985 सालापासूनचे खरेदी खत, जुने दस्त ऑनलाईन पाहा; ते सुद्धा घरबसल्या तुमच्या मोबाईलवर…

Land record जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारामध्ये फसवणूक होऊ नये याकरिता सर्वात आगोदर तुम्हाला एक कागद आवर्जून पाहायला सांगतात, आणि ते कागद म्हणजे जमिनीचे खरेदी खत होय ..

Land record

कोणत्याही जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा म्हणजे खरेदी खत होय, खरेदी खतावर कोणत्याही जमिनीचा व्यवहार किती तारखेला, कोणत्या व्यक्तींमध्ये, किती क्षेत्रावर आणि किती रुपयांत झाला याची सविस्तर माहिती लिहालेली असते. एकदा खरेदी खत झालं की मग ती माहिती फेरफारवर येते आणि सर्वात नंतर सातबाराच्या उताऱ्यावर जमिन खरेदी केलेल्या नवीन मालकाची नोंद होते.

आता सरकराच्या नवीन डिजिटलायजेशनमुळे 1985 पासूनचे खरेदी खत, जुने दस्त तुम्ही तुमच्या मोबाईल फक्त 2 मिनिटांत पाहू किंवा डाऊनलोड शकता. आणि ते कसं करता येईल त्याचीच सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

Land record खरेदी खत, जुने दस्त असे पाहा…

 • 1985 साला पासूनचे खरेदी खत आणि जुने दस्त पाहण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाइलच्या ब्राउजर मध्ये igrmaharashtra.gov.in टाईप करा.
 • त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.
 • या संकेतस्थळावर खाली स्क्रोलडाऊन केल्यावर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस नावाचा एक कॉलम दिसेल.
 • त्या कॉलममध्ये पहिला पर्याय असलेल्या ई-सर्चवर क्लिक केल्यावर तेथील विनाशुल्क सेवा कॉलममधील फ्री सर्चवर क्लिक करायचं आहे.
 • त्याच्या नंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर सर्च फ्लो नावाचे एक पेज ओपन होईल. त्यापेजमध्ये सर्च कसे करायचे या बाबतच्या सविस्तर सूचना दिलेल्या असून त्याला क्लोज केले की तुमच्या मोबाईलच्या एक नवीन पेज ओपन होईल.
Land record

आता या पेजवर तुम्हाला मिळकत निहाय व दस्त निहाय जमिनीचे सर्व रेकॉर्ड सर्च करता येईल. सर्च मध्ये मुंबई/उर्वरित महाराष्ट्र व उर्वरित महाराष्ट्रामधील शहरी भाग या 3 प्रकारांत सर्च करता येतो.

सर्वप्रथम आपण मिळकत निहाय जमिनीचा रेकॉर्ड Land record कसा सर्च करायचा ते जाणून घेऊया.

 • तुम्हाला एखाद्या गावातील जुना रेकॉर्ड पाहायचा असेल तर तुम्हाला उर्वरित महाराष्ट्र हा पर्याय निवडायचं आहे.
 • सर्वप्रथम वर्षं निवडा, इथं तुम्हाला दिसेल की, या पेजवर साल 1985 पासूनच्या खरेदि खत आणि दस्तांचा संपूर्ण रेकॉर्ड म्हणजेच Land record उपलब्ध आहे.
 • त्याच्यानंतर जिल्हा मग तहसील कार्यालय आणि मग गाव निवडून मिळकत क्रमांक टाईप आहे. लक्षात ठेवा कंसात लाल अक्षरात स्पष्टपणे लिहिलंय की, इथे तुम्ही सर्व्हे नंबर/मिळकत नंबर/ गट नंबर/प्लॉट नंबर टाकू शकता.
 • पुढच्या कॉलममध्ये कॅप्चा टाका म्हणजे पुढच्या कॉलममध्ये दिसणारे अंक, अक्षरं जशीच्या तशी टाइप करायची आहेत.
Land record
 • पण, जर का तुम्हाला जमिनीचा मिळकत क्रमांक माहिती नसल्यास तुम्हाला Do you want to take Name Based Search:(Optional) या कॉलम समोरील YES या ऑप्शनवर क्लिक करून सुद्धा सर्च करता येईल, म्हणजे की, जमिनीच्या मालकाचे नाव टाकून सर्च करू शकता. आणि जर मिळकत क्रमांक माहिती असला आणि तो टाकला की, सर्च यावर क्लिक करा.
 • त्याच्या नंतर खालील बाजूस तुम्हाला जुन्या दस्तांची माहिती दिसेल. यामध्ये दस्तांचा क्रमांक, दस्ताचा प्रकार (जसे की, खरेदी खत), किती तारखेला व कोणत्या कार्यालयामध्ये नोंदणी झालीय, शिवाय, जमीन देणाऱ्याचं/घेणाऱ्याचं नावे, किती क्षेत्राची खरेदी झालीय याचे सविस्तर वर्णन लिहलेले तुम्हाला दिसेल.
 • याच ओळीमधील शेवटच्या इंडेक्स-2 या ऑप्शनवर क्लिक केलं की तुम्हाला हे खरेदी खत डाऊनलोड सुद्धा करता येईल. Land record

दस्तनिहाय कसं पाहालं ?
समजा तुम्हाला क्रमांक माहीत नसेल तर तुम्ही दस्त नंबर टाकून सुद्धा जमिनीचा रेकॉर्ड Land record सर्च करू शकता. त्याकरिता दस्तनिहाय या पर्यायावर करून Regular या पर्यायावर वर टिक करा. त्यानंतर तुमचा जिल्हा, मग दुय्यम निंबधक कार्यालय, कोणत्या वर्षाचे दस्त पाहायचे ते वर्ष आणि दस्त क्रमांक टाका. नंतर कॅप्चा टाकून सर्चवर क्लिक करा.

त्याच्यानंतर खालील बाजूस दस्त क्रमांक, दस्ताचा प्रकार, कोणत्या तारखेला व कोणत्या कार्यालयात त्या दस्तची नोंदणी झालीय, या व्यवहारातील जमीन लिहून घेणार-देणार यांचे नाव, तसेच मालमत्तेचं संपूर्ण वर्णन लिहलेलं असतं.

याच ओळीमधील शेवटच्या इंडेक्स-2 या ऑप्शनवर क्लिक केलं की तुम्ही ते खरेदी खत डाऊनलोड करू शकता.

संपूर्ण गावतील जमिनीचे नकाशे घरबसल्या डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

व्यवसाय करण्यासाठी मुद्रा loan कसे घ्यावे ? जाणून घेण्यासाठी क्लिक करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!