Poultry Farming Scheme : 1000 अंड्यावरील कोंबड्यांकरिता 25 लाख रुपये अनुदान 2023

Poultry Farming Scheme ही योजनाकेंद्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे, सन २०२१-२०२२ पासून राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकास कार्यक्रमाची सुधारीत पुनर्रचना सादर करण्यात आलेली आहे.

Poultry Farming

राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या सुधारित योजनेचा उद्देश म्हणजे रोजगार निर्मिती, उद्योजकतेचा विकास, पशुची उत्पादकतेत वाढ करणे आणि याप्रकारे विकास कार्यक्रमांतर्गत एकाच छताखाली Poultry Farming, मांस, लोकर, बकरीचे दूध, अंडीचे उत्पादनात वाढ करणे, वैरणाची उपलब्धतेत वाढ करणे, प्रती पशुधन उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करणे, पशुधनाच्या वंशावळीमध्ये सुधारणा करणे, नाविण्यपुर्ण उपक्रमासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.\

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेची संकल्पना म्हणजे असंघटित क्षेत्रात होणाऱ्या उत्पादनांसाठी विक्रीकरिता बरोबरच त्यांना चांगल्या दर्जेचा कच्चा माल उपलब्ध होण्यासाठी संघटित क्षेत्राशी जोडून उद्योजकतेचा विकास साधणे, ही आहे.

Poultry Farming योजनेचा उद्देश

 • उद्योजकता विकास
 • रोजगार निर्मिती
 • प्रती पशुधनाच्या वंशावळीमध्ये सुधारणा
 • प्राण्यांची उत्पादकता वाढवणे
 • Poultry Farming, कुक्कुट पालन, शेळी मेंढी व वराह पालनामधून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास

कुक्कुट पालन: Poultry Farming
१००० अंड्यावरील कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन
अनुदान अधिकतम रु. ५० लक्ष

अंमलबजावणी यंत्रणा:
पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य पात्र संस्था-व्यक्तीगत/JLG/FCOs/FPO/SHG/कलम-८ अंतर्गत नोंद केलेल्या कंपन्या.

Poultry Farming ठळक वैशिष्टे:

1) अर्जदाराला nlm.udyamimitra.in या वेबपोर्टलवर केंद्रशासनाचे पत्र दि. ९ ऑगस्ट २०२१ तसेच दि. २८ डिसेंबर २०२२ अन्वये प्राप्त NUM सुधारीत मार्गदर्शक सुचनांप्रमाणे अर्ज सादर करावा.
2) राज्याची अंमलबजावणी यंत्रणा सदरील अर्जाची छाननी करून योग्य व पात्र अर्जास Online मंजुरी देण्यात येईल आणि सदर अर्ज बँकेकडे मंजुरीस्तव सादर करण्यात येईल.
3) बँकेने कर्जपुरवठ्याची हमी दिल्यावर सदर प्रकल्प राज्यस्तरीय कार्यकारी समितीसमोर (SLEC) मंजुरीसाठी सादर करण्यात येईल.

4) सदरील प्रकल्पांना SLEC द्वारे शिफारस प्राप्त झाल्यावर, SIA (State Implementing Agency) तर्फे सदर प्रस्तावाचे शिफारस पत्र online portal वर upload करेल व सदर प्रकल्प केंद्र शासनास मंजुरीसाठी सादर करण्यात येईल.
5) केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाची प्रकल्प मंजुरी समिती ही राज्य शासनाने शिफारस केलेल्या प्रकल्पांना मंजुरी देईल व मंजुर प्रकल्पांकरिता अनुदानाची रक्कम (SIDBI) भारतीय लघुउद्योग विकास बँक द्वारे लाभार्थ्यांच्या कर्ज मंजुरी देणारी बँक किंवा वित्तीय संस्थेकडे देईल.

Poultry Farming

योजनेची पात्रता निकष:

1) अर्जदार हा स्वत: अथवा अर्जदाराकडील तज्ञ यांनी प्रकल्पाशी संबंधीत प्रशिक्षित बरोबरच अनुभव असणे गरजेचे.
2) अर्जदारास त्याचे खाते असलेल्या शेड्युल्ड बँकेकडून संबंधित प्रकल्पासाठी कर्ज हमीपत्र आवश्यक.
3) या प्रकल्पाकरिता स्वतःची अथवा भाडेतत्वावर घेतलेली जमीन आवश्यक असून KYC साठी काही कागदपत्रे सुद्धा आवश्यक आहे.
4) अर्जदाराने अर्ज ऑनलाईन सादर करताना द्यावयाची आवश्यक.

Poultry Farming साठी कागदपत्रे:

 • सविस्तर प्रकल्प प्रस्ताव
 • प्रशिक्षण प्रमाणपत्र
 • अनुभव प्रमाणपत्र
 • जमिनिशी सबंधित कागदपत्र (स्वतःची किंवा भाडेकरार) ७/१२
 • प्रस्तावित प्रकल्प जागेचे जीओ टॅग छायाचित्र
 • स्वतःकडील भांडवल किंवा बँक/वित्तीय संस्थांचे कर्ज असल्याचा पुरावा
 • पॅनकार्ड
 • वास्तव्य पुरावा
 • मागील ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
 • कॅन्सल बँक चेक
 • आधार कार्ड
 • अर्जदाराचा फोटो
 • जात प्रमाणपत्र
 • शैक्षणिक प्रमाणपत्र
 • भागीदारी करार
 • वस्तु आणि सेवाकरची नोंद केलेलं प्रमणपत्र (लागु असल्यास)
 • कंपनीचे नोंद केलेलं प्रमाणपत्र ( FCO, FPO, Sec.8 कंपनीसाठी)
 • मागील ३ वर्षाचे ऑडीट रिपोर्ट (लागु असल्यास)
 • मागील ३ वर्षाचे आयकर विवरणपत्र (लागु असल्यास)

अधिक माहितीसाठी आपल्या जवळील शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशूधन विकास अधिकारी यांचाशी संपर्क साधावा.

संपूर्ण गावतील जमिनीचे नकाशे घरबसल्या डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

व्यवसाय करण्यासाठी मुद्रा loan कसे घ्यावे ? जाणून घेण्यासाठी क्लिक करा..

Similar Posts