ABHA Health Card: आभा हेल्थ कार्ड! एका क्लिकवर समजणार तुमच्या आरोग्याची माहिती..

आभा हेल्थ कार्ड तुमच्या आरोग्याची सर्व माहिती नोंदण्याचे एक डिजिटल कार्ड असून यात तुमच्या आरोग्याची सर्व माहिती नोंद केलेली असते. या कार्डमार्फत तुम्ही रुग्णाचा पूर्ण इतिहास सहजपणे समजू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची माहिती एका क्लिकवर समजेल.

आभा हेल्थ कार्ड म्हणजे ?

आभा म्हणजे ‘आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर” (Ayushman Bharat Health Account Number’). आभा कार्डमध्ये तुमच्या आरोग्याची संपूर्ण माहिती असते. हे कार्ड आधारकार्डसारखेच असते. यावर आधार कार्डसारखाच १४ अंकी नंबर असतो. या १४ नंबरचा वापर करुन कोणत्या व्यक्तीला काय आजार असून त्यावर कोणते औषधोपचार सुरू आहे? शिवाय रुग्णाच्या कोणत्या चाचण्या केल्या आहेत? रुग्ण कोणकोणत्या आरोग्य इन्शुरन्सशी जोडला गेला आहे? या सगळ्याची माहिती डिजिटल पद्धतीने साठवण्यात येते .

याशिवाय तुम्हाला हे कार्ड डिलीट सुद्धा करता येते. विशेष म्हणजे, या कार्डमुळे रुग्णाला रुग्णालयात जाताना डॉक्टरांची कागदपत्रे अथवा गोळ्यांची माहिती सोबत नेण्याची गरज नाही. तुमच्या आभा नंबरवरुन आरोग्यविषक संपूर्ण डेटा मिळवू शकता. त्यामुळे जुन्या टेस्टचे रिपोर्ट असतील तर नवीन टेस्ट करण्याची गरज भासणार नाही. यामुळे वेळ आणि पैसा वाचेल.

आभा हेल्थ कार्ड कसे बनवाल?

 • आभा हेल्थ कार्ड तुम्ही सार्वजनिक, खासगी दवाखान्यात किंवा घरबसल्या ऑनलाईन बनवू शकता.
 • सर्वप्रथम https://abdm.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या
 • यानंतर तिथे दिलेल्या आभा नंबरवर (Create ABHA Number) क्लिक करा.
 • आभा हेल्थ कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करु शकता.
 • आधार कार्डचा वापर करुन जर तुम्ही आभा कार्ड बनावट असाल तर त्याकरिता आधार कार्ड आणि मोबाईल नंबर एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे. त्यानंतर Next वर क्लिक करा.
 • आधार नंबर टाकून दिलेल्या सुचना काळजीपूर्वक वाचा.
 • त्यानंतर तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहून Next वर क्लिक करा.
 • आता तुमच्या मोबाईल नंबरवर OTP नंबर येईल, तो नमूद करा.
 • त्यानंतर तुमचे आधार व्हेरिफिकेशन होईल. नंतर नेक्स्ट वर क्लिक करा.

 • त्यानंतर नवीन एक पेज उघडेल. त्याठिकाणी आधार कार्डशी लिंक असलेला मोबईल नंबर टाका.
 • तुम्ही तुमचा ई-मेलदेखील आभा कार्डशी जोडू शकता.
 • त्यानंतर तुमचा आभा नंबर क्लिक झाल्याची माहिती तुमच्या मोबाईलवर/ कॉम्पुटरवर दिसेल. त्याखाली तुमचा आभा नंबर लिहलेला असेल. त्यानंतर Link ABHA Address वर क्लिक करा.
 • त्यानंतर तुम्ही याआधी आभा adress तयार केलाय का असा प्रश्न विचारला जाईल. त्यावर No टिक करा.
 • सुरवातीला तुमचे सर्व Profile Details दाखवले जातील. ते नीट वाचा. मग आभा ऍड्रेस तयार करा.
 • त्यानंतर तुमची माहिती भरुन आभा ऍड्रेस तयार करु शकता. हे सर्व झाल्यावर क्रिएट आणि लिंक वर क्लिक करा.
 • तुमचा आभा नंबर आणि आभा अॅड्रेस लिंक झाल्यावर तुम्हाला मेसेज येईन.
 • यानंतर तुम्ही पुन्हा लिंकवर जाऊन लॉग इन करा. त्यानंतर तुम्ही आभा कार्ड डाउनलोड करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!