SBI Car Loan Information in Marathi | स्टेट बँकेकडून कमी व्याजदरात घ्या कार लोन, घरबसल्या करा अर्ज…

SBI Car Loan

SBI Bank Car Loan in Marathi: प्रत्येकाचे स्वप्न असते की, स्वत:चे हक्काचं घर आणि एक चारचाकी गाडी.. परंतु घरखर्च, वाढती महागाई व अपुरे वेतन अशा अनेक कारणांमुळे कार घेण्याचे स्वप्न अनेक जण लांबणीवर टाकत असतात. अशा वेळी आर्थिक मदतीसाठी कर्ज घेऊ शकता. बॅंक तुम्हाला चारचाकी घेण्यासाठी आर्थिक मदत करते.

बॅंकेकडून लोन घेऊन दारात चारचाकी उभी करण्याचे स्वप्न साकार करता येऊ शकते. अनेक बॅंका कार लोनसाठी खास ऑफरही देत असतात. तुमच्यासाठी स्टेट बॅंकेची खास ऑफर आहे. नवीन कार खरेदी करण्यासाठी भारतीय स्टेट बँक कमी व्याजदरात कर्ज देते. (SBI Car Loan Information in Marathi)

sbi bank car loan कर्ज मिळण्यासाठी नागरिकांना काही महत्वाची कागदपत्रे द्यावी लागतात. तसेच जुनी कार घेण्यासाठीही बॅंक कर्ज देतात.. चला तर मग कार लोनसाठी निकष, कोणती कागदपत्रे लागतात व इतर संपूर्ण माहिती जाणून घेऊ या..

स्टेट बँक ऑफ इंडिया कार लोन
‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ ही देशातील सर्वात मोठी बँक असून नागरिकांचा सर्वात जास्त विश्वास या बॅंकेवर आहे. भारतीय स्टेट बँक 10 लाखाच्या कारसाठी 5 लाख म्हणजेच कारच्या किंमतीनुसार 50 टक्के कर्ज देते. जर तुमची कार 10 लाखांपेक्षा जास्त किमतींची असेल, तर 70 टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जाते.

स्टेट बँक ऑफ इंडिया कार लोनचे व्याजदर 7.50 टक्क्यांपासून सुरू होतात आणि कार कर्जाचे व्याजदर 9.75 टक्क्यांपासून सुरू होतात. ही फ्लोटिंग रेट कर्जे आहेत. भारतातील सर्वात जबरदस्त कार कर्ज आहे. सर्वसाधारण कार कर्जाचा व्याजदर 7.50% ते 8.45% एवढा आहे. या कर्जाचा परतफेड कालावधी 7 वर्षांपर्यंत आहे.

भारतीय स्टेट बँकेच्या कार लोनसाठी किमान ईएमआय (EMI) 1534 रुपये आहे. यासाठी प्रक्रिया शुल्क 0.20% + GST असून प्रीपेमेंट शुल्क झिरो आहे. कर्जासाठी 30 मिनिटांत मंजूरी मिळते. या कर्जासाठी 2.50 लाख रुपये प्रतिवर्ष उत्पन्न असायला हवे. (SBI Car Loan Interest)

कार लोनसाठी पात्रता
कार कर्ज घेण्यासाठी 21 ते 67 वर्षे वयाची व्यक्ती अर्ज करू शकते.
अर्जदार एकतर केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी असणं आवश्यक आहे.
अर्जदार व्यावसायिक, स्वयंरोजगार, शेती आणि संबंधित गुंतलेली व्यक्ती या कार लोनसाठी पात्र आहेत. (SBI Car Loan Eligibility 2022)

आवश्यक कागदपत्रे
ओळखीचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड यापैकी एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे.
रहिवाशी पुराव्यासाठी आधारकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनकार्ड, वीज, पाणी, दुरध्वनी बिल
उत्पन्नाचा पुरावा देण्यासाठी फॉर्म 16, मासिक पगाराची स्लिप, इन्कमटॅक्स रिटर्न, गेल्या सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट
नोट:- कर्जदाराच्या स्थितीनुसार कागदपत्रांमध्ये बदल होऊ शकतो. (SBI Car Loan Document)

असा करा अर्ज..
सर्वप्रथम भारतीय स्टेट बँकेच्या https://sbi.co.in/hi/web/personal-banking/home या अधिकृत वेबसाईटवर जा.
येथे ‘Loans’ पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
यानंतर, ‘Ato Loans’ हा पर्याय निवडा.
sbi car loan आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला विचारलेली माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहे.
यानंतर फॉर्म सबमिट करा. बॅंक तुमच्या अर्जाची पडताळणी करेल. तुम्ही पात्र ठरल्यास बॅंक तुम्हाला कारसाठी लोन देईल.


हे देखील वाचा –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!