Solar AC : आता विजबिलाची चिंता न करता बिनधास्त वापरा AC! 5 मिनिटांत पूर्ण घर होईल थंड!

Solar AC Price and Features: एक प्रकारे, सोलर पॅनेलचा वापर करून सूर्याच्या तीव्र उष्णतेवर रिव्हर्स कार्ड खेळण्याचा हा मार्ग अलीकडेच चर्चेत आला असल्याचं दिसून येत आहे. आता हे सोलर एअर कंडिशनर कसे काम करते, त्याची किंमत किती आहे आणि तुम्ही तुमच्या घरातील एअर कंडिशनरसाठी असे काही करू शकता की नाही, याबद्दल आमच्या या लेखात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Solar AC

सोलर एसी (Solar AC ) बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न: सोलर एसी हा एक प्रकारचा एअर कंडिशनर (Solar Air conditioner) आहे जो सौर ऊर्जेचा वापर करतो. या उत्पादनामागील सगळ्यात भारी युक्ती म्हणजे सूर्याच्या ऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करणे आणि नंतर ती ऊर्जा एअर कंडिशनिंग साठी वापरणे ही आहे. एक प्रकारे, उन्हाच्या तीव्र झळांवर रिव्हर्स कार्ड खेळण्याची ही पद्धत अलीकडे खूप लक्ष वेधून घेत आहे.

Solar AC कसे काम करते?

सौर पॅनेल सौर ऊर्जा गोळा करतात आणि त्या द्वारे वीज निर्माण केली जाते. ही वीज एअर कंडिशनर ला ऑपरेट करण्यासाठी वापरली जाते. या प्रकारच्या सिस्टम मुळे पर्यावरणाचे संरक्षण तर होतेच मात्र या सोबत तुमचे वीज बिलही मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.

Benefits of Solar AC

  • सोलर पॅनेलसह एसी सिस्टीम अधिक विश्वासार्ह असतात आणि त्यांना पारंपारिक एसी सिस्टीमपेक्षा कमी देखभालीची आवश्यकता असते.
  • या एअर कंडिशनर्सना वारंवार देखभाल करण्याची आवश्यकता नसते.
  • सोलर पॅनल एसी (Solar Panels AC) सिस्टीम निवडताना तुमच्या घराचा आकार आणि ऊर्जेची गरज लक्षात घ्या. याव्यतिरिक्त, तुमचे बजेट किती आहे आणि मॉडेलमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान कोणते आहे याचाही विचार करा.
  • पारंपारिक एअर कंडिशनर्सपेक्षा सोलर एअर कंडिशनर्स  50% कमी ऊर्जा वापरू शकतात कारण ते सूर्यापासून मिळवलेल्या ऊर्जेवर अवलंबून असतात.
  • Solar AC पॉवरवर अवलंबून नसल्यामुळे, वायरिंग करण्याची गरज नाही. तुम्हाला इन्स्टॉलेशन किंवा मेन्टेनन्सशी संबंधित कोणताही अतिरिक्त खर्च करण्याची ही गरज नाही.
  • अतिशय शांत आणि कार्यक्षम असे हे सोलर एअर कंडिशनर असतात. पारंपारिक एअर कंडिशनिंग सिस्टमला स्टार्ट केल्यावर जसा आवाजाचा त्रास होतो तसा त्रास इथे सहन करावा लागत नाही.
  • सूर्यप्रकाश नसताना योग्यरित्या कार्य करण्यासाठी एसी मधे बॅटरीज दिलेल्या असतात. मात्र, त्यांची देखभाल होणं आवश्यक आहे.
  • सोलर एसी कमी जागा घेतात.

मी माझ्या घरातील एअर कंडिशनरमध्ये हे सोलर पॅनल जोडू शकतो का?

तुम्ही तुमच्या सध्याच्या एअर कंडिशनिंग सिस्टममध्ये सोलर पॅनेल जोडण्याचा विचार करू शकता. अनेक राज्यांमध्ये घरमालकांना सोलर ऊर्जेवर चालणाऱ्या एअर कंडिशनिंगवर स्विच करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कर क्रेडिट्स देखील दिले जाते.

Price of solar AC in india

भारतामधील सोलर पॅनल एसीची किंमत ही त्या एसीचा उत्पादन प्रकार आणि ब्रँडवर अवलंबून असते. साधारणपणे तुम्ही हा एसी 20,000 ते 50,000 रुपयांना खरेदी करू शकता. खोलीत हे एअर कंडिशनर बसवणे बऱ्यापैकी कठीण काम असल्याने त्याची किंमत 10,000 ते 25,000 रुपयांपर्यंत असू शकते. ही रक्कम पारंपारिक एअर कंडिशनरपेक्षा काही पटींनी जास्त वाटू शकते, परंतु त्यापासून मिळणारे संभाव्य फायदे आणि भविष्यातील बचतीची तुलना केली असता हा व्यवहार फायद्याचा ठरतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!