आमदारांच्या घरांसाठी हर्षवर्धन जाधव यांचे भीक मांगो आंदोलन..!

भिकेत मिळालेले १,९२३ रुपये जमा केले मुख्यमंत्री निधीत..

आमदार उदयसिंग राजपुत यांनी विधान सभेत अर्थ संकल्पीय अधिवेशनात आमदारांना मुंबईत ३०० घर देण्याची मागणी केली. त्यामुळे आमदाराची मुंबईतील घराची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भीक मागो आंदोलन केले, v आंदोलनातून जमा झालेले १ हजार ९२३ रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आल्याची माहिती आहे.

फाटके कपडे घालून हर्षवर्धन जाधवांनी मागितली भीक

कन्नड शहरात रायभान जाधव विकास आघाडीच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले. यात माजी आमदार हर्षवर्धन जाधव व ईशा झा यांनी फाटके कपडे घालून भीक मागितले. यात सर्व पक्षीय आमदारांना घर देण्यासाठी भीक मांगून जमा झालेले १ हजार ९२३ रुपयांचा मदत निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यासाठी तहसिल कार्यालयात जमा करण्यात आला. भिकेत मागितलेले पैसे राज्य सरकारने स्विकारले आहेत, असे उपरोधिकपणे हर्षवर्धन जाधव म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत इशा झा व कार्यकर्ते उपस्थित होते. पाहा व्हिडिओ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!