राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतला फोटो अंबादास दानवेंकडून शेअर, शिवसेना आणि मनसेत फेसबुक वॉर..

काल मुंबई येथे गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरें यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलतांना विरोधकांवर कडाडून टीका केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींमध्ये वाजवल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकर विरोधात वादग्रस्त वक्तव्य करून वातावरण अधिक तापवले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क येथील जाहीर सभेला संबोधित करताना मशिदींतील लाऊडस्पीकरचा वापर बंद न केल्यास मशिदीबाहेरी स्पीकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवू, असे सांगत मशिदींमध्ये एवढ्या मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर का वाजवले जातात? असा सवाल केला होता. आणि जर मशीदीवरील भोंगे नाही काढले तर मशीदीसमोर स्पिकर लाऊन हनुमान चालीसेचे पठन करा असा आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला.

मात्र त्यानंतर यावरून जोरदार राजकारण पेटलं आहे. शिवसेना आणि मनसेत आता धार्मिक विषयांवरून फेसबूक वॉर सुरू झालं आहे. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी थेट राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतला फोटो फेसबूकवर करत त्यासोबत भली मोठी पोस्ट लिहिली आहे. त्यातून त्यांनी राज ठाकरेंवर खरपूस टीका केली आहे. लोकांच्या समस्यांबाबत न बोलता राज ठाकरेंनी धर्मावर बोलून धार्मिक तेढ वाढवल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.

दानवे यांनी फेसबुकवर शेअर केलेली पोस्ट..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!