नाशिकजवळ भीषण रेल्वे अपघात, पवन एक्स्प्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले, हेल्पलाइन क्रमांक जारी..

महाराष्ट्रातील नाशिकजवळ रेल्वे अपघात झाला आहे. एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरल्याने घबराट निर्माण झाली होती. एलटीटी-जयनगर एक्स्प्रेस मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बिहारमधील जयनगरकडे जात होती. यादरम्यान रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरले. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना आज दुपारी ३.१० च्या सुमारास लहवित ते देवळाली दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच अपघात निवारण गाडी आणि मेडिकल व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. या घटनेत दोन मुले जखमी झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसल्याचे सीपीआरओकडून सांगण्यात येत आहे.

सीपीआरओ-सीआरने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनचे सुमारे १० डबे रुळावरून घसरले. त्यामुळे या मार्गावर येणाऱ्या इतर गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग वळवण्यात आले आहेत. आरपीएस टीम प्रवाशांना ट्रेनमधून बाहेर काढत आहे. समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये घाबरलेले लोक जीव वाचवण्यासाठी बाहेर पडत आहेत. पवन एक्स्प्रेस रुळावरून घसरल्यानंतर अनेक गाड्या काही काळासाठी रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. तसेच अनेक गाड्या वळवण्यात आल्या असून काही रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी बसेसचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी रुळाजवळ एक मृतदेह आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र रेल्वेच्या म्हणण्यानुसार हा मृतदेह ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या कोणत्याही प्रवाशाचा नव्हता.

अपघातानंतर १२६१७ निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस, १२०७१ जालना जनशताब्दी एक्सप्रेस, १२१८८ जबलपूर गरीब्रथ ११०७१ वाराणसी एक्सप्रेस०१०२७ एलटीटी-गोरखपूर समर स्पेशल. याशिवाय दिवा-वसई मार्गे जाणाऱ्या 22221 निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आला आहे.

पवन एक्स्प्रेसचे डबे रुळावरून कसे घसरले याची नेमकी माहिती अद्याप समजू शकलेली नाही, मात्र ही घटना ज्या ठिकाणी घडली ते डोंगराळ भाग असून गाडी एका वळणावर असल्याचे सांगण्यात येत आहे. वळणावर येताच मालगाडीचे चाक रुळावरून घसरले आणि त्यानंतर एकापाठोपाठ मागच्या १० बोगी एकापाठोपाठ रुळावरून घसरल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!