शिक्षक भरतीबाबत मोठा निर्णय, आता ‘या’ प्रकारे होणार भरतीची सारी प्रक्रिया…!!

Teacher recruitment : राज्यामधील शिक्षक भरतीसाठी उत्सुक असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे.. राज्यामध्ये 2012 मध्ये शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती, त्यामुळे राज्यातील शासकीय शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त झाली होती. आणि राज्यातील उमेदवार सुद्धा सातत्याने शिक्षक भरतीची मागणी करत होते. त्याचीच दखल घेऊन राज्य सरकारने 2019 मध्ये 12000 शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला.

शिक्षक भरतीची ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी राज्य सरकारने ‘पवित्र’ हे संकेतस्थळ विकसीत केले असून या ‘पवित्र’ वेबसाईटमार्फत शिक्षकांची भरती केली जात आहे. मात्र, त्यामध्येसुद्धा सतत तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया लांबली आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे.

‘MPSC’ मार्फत होणार शिक्षक भरती

शिक्षण आयुक्तालयाने राज्यामधील शिक्षक भरतीची प्रक्रिया ‘MPSC’ मार्फत (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. मात्र, ही प्रक्रिया ‘‘MPSC’ मार्फत राबवण्याकरीता त्यात काही तांत्रिक बदल करावे लागणार असल्यामुळे योग्य ते बदल झाल्यावर ‘शिक्षक भरती’ची प्रक्रिया ‘‘MPSC’मार्फत (MPSC) केली जाण्याची शक्यता आहे.

सध्या खासगी अनुदानित संस्थांमध्ये शिक्षकांची पदे थेट मुलाखतीद्वारे सुरू असून शिक्षक भरती प्रक्रिया आता ‘MPSC’ (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) मार्फतच राबवण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाने सरकारकडे सादर केल्याची माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.

पुढे बोलतांना शिक्षण आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, की “शिक्षकांची भरती ‘एमपीएससी’मार्फत राबविण्याच्या प्रस्तावास ‘‘MPSC’ अध्यक्षांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ‘‘MPSC’मार्फत शिक्षक भरती करताना नियमांमध्ये काही बदल करावे लागतील. मात्र, येणाऱ्या काळामध्ये ‘‘MPSC’मार्फतच शिक्षक भरती केली जाणार आहे.”

शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवणारी ‘‘MPSC’’ ही राज्य सरकारची अनुभवी संस्था असून. ‘‘MPSC’ मार्फत पदभरतीची संपूर्ण प्रक्रिया गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जाते, त्यामुळेच ‘‘MPSC’मार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यामुळे राज्याला गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळतील, असा विश्वास शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!