छत्रपती संभाजीनगरात हॉटेलच्या खोलीत आढळले लव्ह-कपलचे लटकलेल्या अवस्थेत मृतदेह; एकच गल्लीत राहत होते..

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील कर्णपूरा परिसरात असलेल्या हॉटेल पंचवटीमध्ये प्रेमीयुगूलाचे मृतदेह मिळून आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. गुरूवारी दुपारी हॉटेल प्रशासनाला रूममधून प्रतिसाद येणे बंद झाल्याने संशय आल्यानंतर ही घटना समोर आली असून मृत तरुणाचे नाव ऋषिकेश सुरेश राऊत (२६) आणि मृत तरुणीचे नाव दिपाली अशोक मरकड (१८) असे आहे.

सविस्तर माहिती अशी की, ऋषीकेश राऊत हा मुळ बीडकिन गावचा रहिवासी होता. गावातच त्याचा छोटा व्यवसाय असून वडील शासकीय सेवेत क्लर्क आहेत. दोन, भाऊ, आई वडिलांसह तो गावाच्या सोनार गल्लीत राहतो. तर दिपाली मरकड ही मुळ ढाकेफळची. काही महिन्यांपासून दिपाली बीडकीन येथे मामाकडे राहत होती. मात्र, दोन दिवसांपासून दोघेही अचानक एकाच वेळी बेपत्ता झाले होते.

बुधवारी त्या दोघांनी कर्णपुरा परिसरात हॉटेल पंचवटी मध्ये ३०५ क्रमांकाची रूम बुक केली होती. गुरूवारी सकाळी मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही. आवाज देऊनही आतून प्रतिसाद येत नसल्याने वेटरने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडून पाहिल्यावर दोघेही मृत लटकलेल्या अवस्थेत आढळले. घटनेची माहिती कळताच वेदांतनगरचे निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली.

ऋषिकेश राऊत व दीपाली मरकड बुधवारी रात्री ९ च्या सुमारास मोटारसायकलवर हॉटेल पंचवटीत मुक्कामाला थांबले होते. सकाळी रूम स्वच्छ करण्यासाठी दरवाजा उघडत नसल्याने कर्मचाऱ्याने ही बाब रिसेप्शनला सांगितल्यावर रूममधील लँडलाइनवर फोन केला असता दोघांनी उचलला नाही. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मोबाइलवर फाेन केला असता दोघांचेही मोबाईल स्विच ऑफ होते. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी ही बाब वेदांतनगर पोलिसांना सांगितली. पोलिस निरीक्षक ब्रह्मगिरी पथकासह घटनास्थळी पाेहोचले. दरवाजा ताेडल्यानंतर दाेघांनी गळफास आत्महत्या केल्याचे दिसले. दरम्यान, रुममध्ये ३ मोबाइल, बिअरच्या दाेन बाटल्या सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.

कुटुंबातून होता लग्नाला विरोध
दाेघेही एकाच गल्लीत राहत असल्यामुळे त्यांच्यात मैत्री हाेऊन प्रेम झाले. मात्र, लग्नाला कुटुंबातून विरोध होता. मंगळवारी बिडकीन पोलिस ठाण्यात ऋषिकेश बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाइकांनी दिली होती.

Similar Posts