विमानतळ परिसरामध्ये ड्रोन उडवल्यास केल्यास ड्रोनवर गोळ्या झाडण्याचे आदेश.!

औरंगाबाद शहरातील विमानतळाच्या तीन किलोमीटर परिसरात आकाशात ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली असून सुरक्षेच्या कारणामुळे हा नियम बनावण्यात आला आहे. विमानतळ प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ड्रोन उडताना दिसल्यावर प्रथम त्याला ड्रोन खाली उतरवण्याचा इशारा देण्यात यावा. सदरील आदेशाचे पालन न केल्यास ड्रोनवर गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

विमानतळ प्रतिबंधित श्रेत्राच्या तीन किलोमीटर आंतरावरील क्षेत्रामध्ये विना परवानगी ड्रोन उडवल्यार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा स्पष्ट आदेशसुद्धा देण्यात आला आहे. त्यामुळे विमानतळ परिसरात चित्रीकरण करण्यासाठी ड्रोन उडवणाऱ्या नागरिकांनी अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सुरक्षतेसाठी घेण्यात आला हा निर्णय

विमानतळ प्रतिबंधित क्षेत्रामध्ये विना परवानगी ड्रोन उडवल्यामुळे मागील तीन वर्षामध्ये दोन जणांवर 2021 मध्ये केंद्र शासनाने केलेल्या ड्रोन विषयक नियमावलीनुसार विमानतळ प्राधिकरणाने ही कारवाई केली आहे . या आदेशानुसार केंद्रीय औद्योगिक सुरक्षादल ड्रोनला गोळ्या मारून खाली पाडू शकतात. याबरोबरच संबंधितांना जेलमध्ये जाण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. विमानतळ सुरक्षितता तसेच शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ड्रोन बंदी घालण्यात आली आहे. तसेच विमानतळ परिसरामध्ये ड्रोन उडवायचे असल्यास विमानतळ प्रशासनाची परवानगी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

जून 2021 मध्ये जम्मू विमानतळावर स्फोटके असलेले दोन ड्रोन आढळल्याच्या पार्श्वभूमीवर ही नियमावली तयार केली आहे. ड्रोन किंवा रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या विमानांच्या सहाय्याने शहरावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो. यासाठी केंद्र शासनाने या संदर्भातील नियम कडक केले आहेत.

नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार

कोविडपूर्व काळात विमानतळाच्या 3 किमी क्षेत्रात ड्रोन उडवण्याची परवानगी एका संस्थेने मागितली होती. मात्र परवानगीची मुदत संपल्यावरही ड्रोन उडवल्याने त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले होते. विमानतळाशेजारी असलेल्या मंगल कार्यालयात आयोजित लग्नसमारंभात विना परवाना ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात येत होते. हे दोन्ही प्रकार सीआयएसएफ जवानाच्या निदर्शनास येताच कारवाई करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!