😨 धक्कादायक..! कन्नड तालुक्यातील तरुणाची विषारी औषधाच्या दोन बाटल्या पिऊन आत्महत्या

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील एका तरुणाने आत्महत्येचा व्हिडीओ मोबाईलमध्ये बनवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमंवर व्हायरल होत असून तो पाहून धक्का बसू शकतो.

माझ्या कुटुंबात माझ्यामुळे तणाव निर्माण होत असून त्यामुळेच मी आपले जीवन संपवत आहे असे म्हणून दोन्ही बाटल्यांचे विष ग्लासात टाकून तो पिला. त्यानंतर माझ्या कृतीला मीच जबाबदार आहे, इतर कोणावरही आरोप करू नका, त्यांना त्रास देऊ नका, अशी विनंतीही त्याने व्हिडिओमध्ये वारंवार केली. विष प्राशन केल्यानंतर तरुणानेच व्हिडिओ बंद केल्याचे दिसत आहे. मात्र औरंगाबादच्या आत्महत्येच्या या व्हिडिओने औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे.

आत्महत्या केलेला तरुण कन्नड तालुक्यातील

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो कन्नड तालुक्यातील तरुणाचा असल्याचे कळाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तालुक्यातील निर्जन स्थळी घडली. चौकशीनंतर तरुणाची ओळख पटली. कन्नड येथील सुनील ढगे असे या तरुणाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड नैराश्यात होता. त्याने नैराश्येतून आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

व्हिडिओ नंतर लगेच झाला मृत्यू

दरम्यान, व्हिडिओचे लोकेशन मिळताच पोलिस आणि तरुणाचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. तरुणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याला जीव गमवावा लागला होता. विष प्राशन केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुनीलच्या या कृत्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!