‘या’ गोष्टी करतात आयुष्य बर्बाद, तरुणांनी कोणती काळजी घ्यावी..?
सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या राजसभेमध्ये आचार्य चाणक्य महामंत्री होते. त्यांनी लिहिलेला कौटिल्य अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतला एक देदीप्यमान ग्रंथ मानला जातो. या ग्रंथामध्ये 25 प्रकरणं आणि 6 हजार श्लोक आहेत. आणि राजकारण आणि अर्थशास्त्रावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ मानला जातो. या ग्रंथामध्ये सांगितलेली नीती चाणक्यनीती म्हणून ओळखली जाते. माणसानं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात कसं वागावं, कसं जगावं याची उत्तरं चाणक्य-नीतीमध्ये सापडतात.
या पुस्तकामध्ये मालमत्ता, मित्र, करिअर, महिला, वैवाहिक जीवन यासह माणसाने कोणत्या पद्धतीने आयुष्य जगावं, याबाबत सखोल मार्गदर्शन केलं आहे..
आयुष्यातील प्रत्येक टप्पा तसा महत्वाचाच असतो. मात्र, तरुणपणात सर्वाधिक काळजी घ्यायला पाहिजे. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तरुणांनी काय करायला हवं, याबाबत आचार्य चाणक्यांनी मार्गदर्शन केलं आहे..
तरुणांनी कोणती काळजी घ्यावी..?
आळस : तारुण्यात आळशीपणाने घेरल्यास जीवनातला बहुमूल्य वेळ गमावून बसतो. तरुणांनी नेहमी आपल्या आयुष्यातील सर्वाधिक ऊर्जावान वेळेचा जास्तीत-जास्त सदुपयोग करण्याचा प्रयत्न करावा.
व्यसन : युवा अवस्थेत कोणतंही व्यसन लागल्यास, माणसाचं जीवन बरबाद होतं. शारीरिक आरोग्य, कौटुंबिक जीवन, आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो. तो नैराश्याच्या सावलीत सापडतो. नंतर इच्छा असूनसुद्धा त्याचं आयुष्य पुन्हा रुळावर येत नाही.
अनावश्यक गोष्टी : तारुण्यात अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ घालवल्यावर नंतर पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. त्यामुळे अशा गोष्टीं पासून नेहमी दूर राहिले पाहिजे. या काळामध्ये तरुणांनी स्वतःची हुशारी, कौशल्यं वापरुन ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावा.
वाईट संगत : एखादा माणूस कितीही संस्कारी, गुणसंपन्न, मेहनती, बुद्धिमान असला, तरी त्याला वाईट संगत लागल्यास त्याच्या आयुष्याचं मोठं नुकसान होतं. वाईट संगतीमुळे आयुष्यामध्ये तो केव्हाही मोठ्या संकटामध्ये सापडू शकतो. आपलं भविष्य खराब करू शकतो.