धक्कादायक! राज्यातील नेते मंडळींनीच थकवले कोटींचे वीज बील; जाणून घ्या कोणी किती थकवले..
वीज बिल थकबाकीदार ‘व्हीआयपी’ ग्राहकांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली असून आमदार, खासदार, मंत्री अशा जवळपास ३७२ ग्राहकांकडे सुमारे १ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती उघड झाली आहे.
भारनियमन, विजेच्या दरावरून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना विरोधी पक्षाने लक्ष्य केले आहे. तसेच सर्वसामान्यांमध्येही नाराजीचा सूर आहे. सामान्य ग्राहकांकडे फक्त शेकडो रुपयांचे विजबिल थकबाकी असल्यास तगादा लावण्यात येतो, त्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात येते. तर मग व्हीआयपींकडील थकबाकी वसूल करून बत्ती गुल का करत नाही, असा सवाल ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
कोणाकडे किती वीजबिल बाकी
● आरोग्यमंत्री राजेश टोपे– ४ लाख रुपये
● महसूलमंत्री बाळासाहेब थोरात– १० हजार रुपये
● काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले– २ लाख ६३ हजार रुपये
● राज्यमंत्री विश्वजित कदम– २० हजार रुपये
● श्रीमंत युवराज संभाजीराजे– १ लाख २५ हजार
● माजी मंत्री सुभाष देशमुख– ६० हजार रुपये
● भाजप आमदार जयकुमार गोरे– ७ लाख रुपये
● माजी गृहमंत्री अनिल देशमुख – २ लाख २५ हजार
● केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे – ७० हजार रूपये
● आमदार समाधान आवताडे– २० हजार
● आमदार राजेंद्र राऊत, बार्शी– ३ लाख ५३ हजार रूपये
● आमदार बबनराव शिंदे व त्यांचे आमदार बंधू संजय शिंदे आणि कुटुंबियांचे २२ कनेक्शन – ७ लाख ८६ हजार रुपये
● खासदार रणजितसिंह निंबाळकर – ३ लाख रुपये
● आमदार संग्राम थोपटे– १ लाख रुपये
● माजी खासदार प्रतापराव जाधव– १ लाख ५० हजार रुपये
● शिवसेना आमदार सुहास कांदे– ५० हजार रुपये
● आमदार रवी राणा – ४० हजार रुपये
● आमदार वैभव नाईक – २ लाख ८० हजार रुपये
● माजी मंत्री विजयकुमार गावित– ४२ हजार रुपये
● माजी आमदार शिरीष चौधरी– ७० हजार रुपये
● मंत्री संदीपान भुमरे– १ लाख ५० हजार रुपये
● खासदार रजनीताई पाटील– ३ लाख रुपये
● आमदार प्रकाश सोळंके– ८० हजार रुपये
● आमदार संदीप क्षीरसागर– २ लाख ३० हजार रुपये
● राज्यमंत्री संजय बनसोडे– ५० हजार रुपये
● आमदार अशिष जयस्वाल– ३ लाख ३६ हजार रुपये
● आमदार महेश शिंदे– ७० हजार रुपये
● माजी मंत्री सुरेश खाडे – १ लाख ३२ हजार रुपये
● सुमन सदाशिव खोत– १ लाख ३२ हजार रुपये
दरम्यान केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावर प्रतिक्रीया देताना आपल्याकडे थकबाकी नसल्याचे स्पष्ट केलं आहे.