‘राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित!’ 5 जूनला अयोध्येला जाणार नाहीत, कारण पुण्यात सांगणार!
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित झाल्याची माहिती खुद्द राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटरवरुन दिलीय. राज यांची तब्बेत बरी नसल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आलंय. तसेच पुण्यामधील सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार असल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
राज ठाकरे हे मुंबईला परतल्यापासूनच त्यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल चर्चांना उधाण आलं होतं. आज या चर्चांना पूर्णविराम देत राज यांनी दौरा स्थगित झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलंय.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. राज ठाकरे यांनी उत्तर भातीयांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली होती. राज ठाकरे यांनी या पूर्वी केलेल्या आपल्या भाषणांतून उत्तर भारीयांचा अपमान केला असल्याचं आरोप बृजभूषण सिंह यांनी केल्यावर राज ठाकरेंचा अयोध्या दौरा खूपच चर्चेत आला होता. दरम्यान, आता राज ठाकरे यांचा हा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करत असल्याचं स्पष्ट केलंय.