भावजयीवर दिराने केला अत्याचार; सिल्लोड तालुक्यात घडली नात्याला काळिमा फासणारी घटना..

सिल्लोड तालुक्यामधील पळशी शिवारामध्ये आईसमान असलेल्या भावजयीवर दिरानेच अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितीच्या फिर्यादीवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अत्याचार केल्यानंतर आरोपी दिर फरार झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडितेचे कुटुंब पळशी शिवारामधील एका शेत वस्तीवर राहतात. मंगळवारी रात्रीच्या वेळी पीडित महिला घराच्या पाठीमागे बाजेवर बसून मोबाईल पाहत बसली होती. मध्यरात्री आरोपी दिर त्या ठिकाणी आला आणि पीडित महिलेचे तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी देऊन बळ-जबरीने अत्याचार केला. या घटनेनंतर पीडिता प्रचंड घाबरली आहे. त्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला.

घडलेला सर्व प्रकार पिडीत महिलेने कुटुंबातील सदस्यांना सांगितला आणि बुधवारी सकाळी महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार झाला असून त्याचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विजय मराठे करत आहे. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!