एका हातात पेट्रोल अन् दुसर्‍यात डिझेल.. गॅस सिलेंडरवर बसून फुलंब्री तालुक्यातील तरुण शेतकरी काय बोलतोय ते एकदा पहाच..

हातात पेट्रोल व डिझेलच्या बाटल्या अन् कमरेला गॅस सिलेंडर बांधून फुलंब्री तालुक्यातील एक शेतकरी थेट डि. पी. वर चढल्याची घटना घडलीय.

अल्ला हो अकबर जय हनुमान..!
सबको उजाला दे भगवान असं म्हणत या तरुण शेतकर्‍यानं वेगळ्याच अंदाजात आंदोलन केलंय.

त्या तरुणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात चांगलाच व्हायरल होतोय.

फुलंब्री तालुक्यातील आळंद गावात सकाळी नऊ वाजता युवा शेतकरी मंगेश साबळे यांनी MSEB कार्यालयातील DP वर चढून वेगळ्या अंदाजात आंदोलन केलंय.

मंगेश या तरुण शेतकऱ्याने प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही प्रशासन निवेदनाची दखल घेत नसल्याने शेवटी वैतागलेल्या मंगेशने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

Similar Posts