ब्राह्मण रणरागिणी ग्रुप तर्फे कमिशनर ऑफ पोलीस औरंगाबाद मा श्री निखिलकुमार गुप्ता यांना कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
आ. अमोल मिटकरी यांनी सांगलीमधील सभेमध्ये ज्या शब्दात सर्व ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत ते अतिशय निंदनीय आहे, व आमदार पदावर असलेल्या व्यक्तीकडून समाज अशी अपेक्षा करू शकत नाही.
त्या सोबतच तिथे उपस्थित असलेले मान्यवर जयंत पाटील व धनंजय मुंडे यांनी देखील याला विरोध न करता त्या गोष्टीचे पूर्णपणे हास्यसुख घेतले त्या विषयी देखील नाराजीचा सुर संपूर्ण समाजातून व्यक्त होत आहे.
व याच प्रकरणावर सोशल मीडियावरील विविध गलिच्छ प्रतिक्रिया बंद करण्यात याव्या, या संबंधीचे निवेदन ब्राह्मण रणरागिणी ग्रुप तर्फे पोलिस कमिशन मा श्री निखिल कुमार गुप्ता यांना देण्यात आले. तसेच त्यांनी या बाबत सांगली पोलीस यांच्याकडे सखोल चौकशीचे आदेश व सायबर सेलकडे सोशल मीडियावर ज्या आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकण्यात येतील हे आश्वासन ब्राह्मण रणरागिणी महिला मंडळला दिले.
या वेळी सौ. सुचिता कुलकर्णी, सौ. आरती तिवारी, सौ. प्रिया डुघरेकर, सुचिता देशमुख व वर्षा कुलकर्णी उपस्थित होत्या