या 5 चुकांमुळं मुलांच्या मनामधून आई-वडील उतरतात; त्यामुळे अशा गोष्टींची नेहमी घ्यायला हवी काळजी

आपल्या अपत्यांना चांगले संस्कार व चांगल्या सवयी लावणं ही प्रत्येक आई वडिलांचे कर्तव्य आहे. आपल्या मुलांच्या वागण्याने कोणाचे मन दुखावले जाऊ नये, यासाठी पालक नेहमीच प्रयत्नशील असतात.

आपले मुले जेव्हा चुकीची वागतात तेव्हा सर्व प्रथम पालकांनाच दोषी ठरवले जाते, पालकांनी मुलाला काही शिकवलं नसेल, असे म्हटलं जातं. मुलं ही मुलं असली तरी त्यांना योग्य-अयोग्य यातील अंतर कळायला वेळ लागतो. मुलांच्या चुकीबद्दल त्यांना कसे वागवायचं ही जबाबदारी अशा आई वडिलांची असते. कित्येकदा मुलांकडून अशा चुका होतात की आई-वडिलांच्या संयमाचा बांध सुटतो. अशा वेळी आई वडिलांना लगेच मुलाचा राग येतो, आणि ते मुलांवर हात उचलतात.

पण हे सर्वथा चुकीचे आहे, त्यामुळे मुलाचा आत्मसन्मान दुखावतो. ईटीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या परिस्थिती मध्ये आई वडिलांनी स्वतःला विचारलं पाहिजे की, तुम्ही तुमच्या मुलावर रागावत आहात की त्यांना शिक्षा करत आहात? तुम्हाला मुलाच्या वागण्यात काय बघायचे आहे? तुमच्या मुलाची वागणूक नम्र आणि चांगली असावी, असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या पालकत्वाच्या शैलीकडे लक्ष द्यावे लागेल.

तुमच्या काही चुका मुलाला अती हट्टी आणि आक्रमक बनवतात. मुलाला मारून नाही तर त्यांना समजावून सांगा – मुलांना कधीही प्रकारे मारू नये, ज्यामुळे त्यांना मानसिक दडपणाखाली गुदमरल्यासारखे वाटेल, या प्रकारची खरडपट्टी काढू नये. याद राखा, तुम्ही मुलाशी ज्या पद्धतीने वागाल तेच मूल शिकेल आणि तो मोठा झाल्यावर त्याच्या मध्ये सुद्धा तीच प्रवृत्ती येईल. म्हणून, मुलांना कधीही मारहाण करू नका आणि त्यांना सुधारण्यासाठी समजावून सांगा.

मुलांशी दुटप्पी वर्तन करू नका

एखाद्यावेळेस खूप रागावायचे आणि एखादे वेळेस त्यानं काहीही केलं तरी बोलायचे नाही, असे करणं चुकीचं आहे. त्यामुळे मुलांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यापेक्षा कोणत्याही परिस्थितीत त्यांना चांगलं वागण्याविषयी सांगत राहा.

शिवाय त्यांना आपण सूचना देतो पण कधीच स्वत: त्या सूचना पाळत नाही, असा दुटप्पीपणा करू नका, हे मुलांच्या लगेच लक्षात येतं. कधीच कठोर नियम बनवू नका.

कित्येकवेळा पालक आपल्या मुलाकडून आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कठोर भूमिका घेतात. पालक मुलांवर असे नियम लादतात की ज्यांचे पालन करणे मुलांसाठी कठीण होऊन जाते. मुलांसोबत अधिक कठोर भूमिका घेतल्याने त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो.

पालकांनी आपला मुद्दा थोडक्यात मुलाला चांगल्या प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा, जास्तीची सक्ती करू नये. कित्येकवेळा असे दिसून आले आहे की पालक आपल्या मुलांना पुढे जाण्यास, खाण्यास, फिरण्यास किंवा कोणत्याही कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी भाग पाडतात. पालकांची ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या मनात पालकांविषयी भीतीचा अतिरेक होऊन त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची भीती वाटते. मुले आपली ईच्छा कोणाला सांगण्यास सुद्धा घाबरतात.

मुलांना कधीही धमकावू नये, जर तुम्ही मुलाला प्रत्येक गोष्टीवर धमकावून सांगितली तर तो भविष्यामध्ये काहीतरी चुकीचे पाऊल उचलण्याचा विचार करू शकतो. अशी परिस्थिती टाळण्यासाठी मुलांना प्रेमाने समजावून सांगा आणि त्यांना धमकावू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!