राज्यासमोर नवं संकट, ऐन उन्हाळ्यात होणार नागरिकांचे हाल..!

राज्यात उन्हाच्या तडाका वाढत असतानाच, नागरिकांसमोर एक नवं संकट उभं राहिलं आहे..

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विजेची टंचाई निर्माण झाली असून येणाऱ्या काळात ग्रामीण भागासह शहरी नागरिकांनाही लोडशेडिंगचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे..

मागील काही दिवसांपासून राज्यात वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाचा तुटवडा जाणवत आहे. राज्यामधील अनेक वीज निर्मीती केंद्रावर केवळ दोन-तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध असल्यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम होत आहे. सध्या राज्यामध्ये 28,700 मेगावॅट विजेची मागणी आहे आणि ती या उन्हाळ्यात 30 हजार मेगावॅटपर्यंत जाऊ शकते. उन्हाळा लवकर सुरू झाल्याने विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झालीय.

राज्यामध्ये सध्या 3 हजार मेगावॅट ते 4 हजार मेगावॅट विजेची तूट असून ती भरुन काढण्यासाठी महावितरणला कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडकडून 60 मेगावॉट वीज तात्पुरत्या काळासाठी 5.50 ते 5.70 रुपये प्रति युनिट दराने घेण्यास राज्य मंत्रीमंडळाने परवानगी दिलेली आहे.

लोडशेडिंग’चं वेळापत्रक जारी

सध्या गुजरातमध्ये सप्ताहात एक दिवस वीज बंद केली जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा लवकरच ‘ब्लॅक आउट’ म्हणजेच ‘लोडशेडिंग’चा सामना करावा लागू शकतो. तसे होऊ नये म्हणून महावितरणने आतापासूनच ‘लोडशेडिंग’चं वेळापत्रक जारी केलंय.

त्यानुसार दिवसा 8 किंवा रात्री 8 तासांची वेळ निश्चित करण्यात आलीय. यासंदर्भात सविस्तर परिपत्रक काढण्यात आलं आहे. संबंधित वेळापत्रक 1 एप्रिलपासून लागू झालं असून, जून 2022 पर्यंत लागू असेल, असं सांगण्यात आलं..

दरम्यान, राज्यात भारनियमन असले, तरी या भारनियमनाचा भार उद्योग-व्यवसायावर नसणार असे स्पष्टीकरण अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं.

Similar Posts