वैजापूर मध्ये रस्त्यावर कंडोमचा ढिगारा…
वैजापूर तालुक्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. शनिवारी सकाळी परसोडा – खंडाळा रस्त्याच्या मधोमध शेकडो कंडोमचा ढिग आढळला आहे. रस्त्यावर कंडोमचा सडा पाहून नागरिकांना धक्काच बसला असून एवढे कंडोम रस्त्यावर का फेकण्यात आले याची चर्चा सुरू आहे.
वैजापूर मधील विनायक साखर कारखाना चौक पासून जवळच खंडाळा ते परसोडा येथे जाणाऱ्या रस्त्यावर कंडोमचा सडा बऱ्याच दूर पर्यंत पडलेला होता. विशेष म्हणजे हे कंडोम पाकीटमध्ये नसून तर मोकळे पडलेले होते.
जवळच आहे आरोग्य केंद्र…
ज्या जागी हे कंडोम सापडले तिथून तीन किलोमीटर जिल्हा परिषदेचं आरोग्य केंद्र असून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रशासन आरोग्य केंद्रात मोफत कंडोम उपलब्ध करून देतात. त्यामुळे हा कंडोमचा साठा तोच तर नाही ना? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.