Kusum Solar jYoana Online Payment

Kusum Solar Yojana Online Payment | कुसुम सोलर पंप योजना, ऑनलाईन पेमेंटचे ऑप्शन आले, असे करा पेमेंट..

Kusum Solar jYoana Online Payment
Kusum Solar jYoana Online Payment

Kusum Solar Pump Yojana Online Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कुसुम सोलर योजनेबाबत महत्वाची माहिती आहे. ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत असणारी एक योजना जिचे नाव प्रधानमंत्री कुसुम योजना असे असून या योजनेच्या माध्यमातून सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

शेतकरी बांधवांना महाऊर्जाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करावेत. हे अभियान घटक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण मार्फत अर्जदारांचे ऑनलाईन अर्ज मागवून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर सौर पंप येणार आहे. (Kusum Solar Pump Payment Online)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. राज्यातील शेतकऱ्यांना 3H.P., 5H.P. व 7.5H.P. क्षमतेच्या सौर कृषी पंपासाठी अर्ज करता येतो. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदान दिले जाते. Kusum Solar Pump Yojana Online

kusum solar pump yojana update कुसुम सोलर योजनेबाबत महत्वाची अपडेट आहे. (PM Kusum Solar Pump Yojana) याअगोदर तुम्हाला कुसुम सोलर पंप योजनेत ऑनलाईन अर्ज करताना पेमेंट ऑप्शन येत नव्हते. आता पेमेंट ऑप्शन उपलब्ध झालेले आहे. कुसुम सोलर पंप योजनेत पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ज्या शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे, अशा शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन उपलब्ध झाले आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यां मॅसेज देखील आला असेल. तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन पेमेंट करू शकता. (Kusum Solar Pump Yojana Maharashtra)

ऑनलाईन पेमेंट तुम्हाला जर करता येत असेल, तर तुम्ही करू शकता. तुम्हाला पेमेंट करता येत नसेल तर तुम्ही जवळच्या सीएससी केंद्र (CSC) किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्राला भेट देऊन पेमेंट करू शकता. शेतकऱ्यांसाठी पीएम कुसुम सौर योजनेबाबत हीच होती महत्वाची अपडेट.. ही माहिती पुढे शेतकऱ्यांना नक्की शेअर करा.


हे देखील वाचा-


Similar Posts