Police Bharti 2023 :अखेर पोलीस भरती लेखी परीक्षेची तारीख ठरली; ‘या’ तारखेला होणार लेखी…

Police Bharti 2023 : मैदानी परीक्षा झाल्यावर तब्बल अडीच महिन्यांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर पोलीस भरतीची लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली असून शिपाई व चालक पदासाठी दि. २६ मार्चला, तर शिपाई पदासाठी दि. २ एप्रिलला लेखी परीक्षा होणार आहे. या संदर्भातील माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.

मुंबई वगळता संपूर्ण राज्यात एकाच वेळी पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा होणार आहे. या संदर्भातील माहिती पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी दिली आहे. लेखी परीक्षा 90 मिनिटांची तर 100 गुणांची असेल. त्याचे स्वरूप ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच बहूपर्यायी असेल. Police Bharti written exam 2023

सीसीटीव्ही कॅमेरे ठेवणार वॉच (Police Bharti 2023)
लेखी परीक्षेचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु पात्र उमेदवारांना एमएच-आयटीकडून परस्पर हॉल तिकीट उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती आहे. ज्या शाळा/महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये किंवा खोल्यात CCTV कॅमेरे उपलब्ध आहेत, तेथेच परीक्षेची व्यवस्था करण्यात येणार आहे, ज्या खोल्यात CCTV नाही त्या प्रत्येक वर्गात स्वतंत्र व्हिडिओग्राफर नियुक्त केला जाणार आहे. मैदानी चाचणीसाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांचे फोटो व अंगठ्याचा ठसा पोलिसांनी नोंदवून घेतला आहेच.

लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहणारे उमेदवार तेच आहेत की नाही, याची खात्री केली जाणार आहे. त्यामुळे गैरप्रकारांना नक्कीच आळा बसेल, अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक ओला यांनी व्यक्त केली. (Police Bharti written exam 2023) शिवाय परीक्षेच्या दिवशी वेळेच्या आधी 2 तास उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!