सावधान..! वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला तर…!!

मोदी सरकारने मागील काही दिवसांमध्ये वाहतुकीचे नियम अधिकच कडक केले असून त्यामुळे आता ट्रॅफिक (वाहतूक) पोलिसांकडून वाहनाची आणि वाहनचालकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकारात वाढ झालेली आहे. काहींची मजल तर पोलिसांना मारहाण करण्यापर्यंत गेलेली दिसते.

Motor Vehicle Act : खरं सांगायचं तर, मोटार वाहन कायद्याप्रमाणे वाहतूक पोलिसांना तुमची कागदपत्रे तपासण्याचा पूर्ण अधिकार आहे. तरीपण अनेक जण नियमभंग करुन वर वाहतूक पोलिसांनाच अरेरावीची भाषा वापरतात. मात्र, सावधान..!! जर का यापुढे वाहतूक पोलिसांसोबत विवाद घालण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं.

कायदा काय म्हणतो?

वाहनाची कागदपत्रे तपासत असताना किंवा कोणत्याही प्रकारे वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातल्यास, नियम 179 ‘MVA’नुसार, वाहतूक पोलिस तुमचे 2000 रुपयांपर्यंत चालान कापू शकतो. तसा अधिकारच वाहतूक (Traffic police) पोलिसांना आहे. त्यामुळे जरी तुमच्याकडे वाहन संबंधित सगळी कागदपत्रे असली, तरी सुद्धा तुमच्या खिश्याला 2000 रुपयांचा कात्री लागू शकतो.

रस्त्यावर वाहन चालवताना, ट्रॅफिक पोलिसांशी कोणत्याही प्रकारे अव्यवहार न करण्याचे भान राखलेलेच बरे. पण जर का, वाहतूक पोलिसाने तुमच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर, त्यांच्याशी विवाद घालण्यापेक्षा तुम्ही त्याचा व्हिडिओ बनवून त्याची तक्रार करता येते. असले प्रकरण कोर्टात नेण्याचाही पर्याय आहे.

नवीन नियमाप्रमाणे, आता बाईकवर प्रवास करताना हेल्मेटचा बेल्ट लावलेले असणं अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा जरी तुम्ही हेल्मेट घातले असलं, तरी सुद्धा मोटार वाहन कायद्यानुसार, 1000 रुपयांचे चालान कापले जाऊ शकते. तसेच, सदोष हेल्मेट (BIS शिवाय) असल्यास सुद्धा 1000 रुपयांचे चालान आकारले जाते.

कार मध्ये मागे बसल्यावर सुद्धा सीट बेल्ट लावणे आवश्यक..

केंद्रीय मोटार वाहन नियमांच्या कलम 138(3) अंतर्गत, मागच्या प्रवाशांना सीट बेल्ट घालणे अनिवार्य आहे. तथापि, जागरूकता आणि अंमलबजावणीच्या अभावामुळे, मागील बहुतेक लोक सीट बेल्ट घालत नाहीत. अपघात झाल्यास समोरच्या प्रवाशांपेक्षा मागचे प्रवासी सुरक्षित असतात असा लोकांमध्ये एक गैरसमज आहे. मात्र, क्रॅश चाचण्यांनी हे सिद्ध केले आहे की मागील सीट बेल्ट घालणे हे पुढील सीट बेल्ट घालण्याइतकेच महत्त्वाचे आहे. याआधी हा नियम फक्त ड्रायव्हर आणि पुढच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना लागू होता. कलम 381(3) हे स्पष्ट करते की कारमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने, मग तो पुढे किंवा मागे बसलेला असो, चालत्या वाहनात सीट बेल्ट लावला पाहिजे. यापूर्वी सीटबेल्ट न लावल्यास 500 रुपयांचे चलन कापले जात होते, मात्र आता नव्या तरतुदींमध्ये ते 1000 रुपये करण्यात आले आहे.

गाडीवरील दंड कसा समजणार..?

बऱ्याचदा वाहतूक पोलिसांंकडून तुमच्या गाडीच्या क्रमांकावर चालान फाडले जाते. म्हणून तुमच्या वाहनांवर दंड आहे किंवा नाही, हे जाणून घेण्यासाठी https://echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जाऊन तेथे ‘चेक चलन स्टेटस’वर क्लिक करा. तुमच्यासमोर चलन नंबर, वाहन नंबर व ड्रायव्हिंग लायसन्स नंबर (DL)चा पर्याय मिळेल. वाहन नंबरचा पर्याय निवडून आवश्यक माहिती भरा. नंतर गेट डिटेलवर वर क्लिक केल्यावर चालानची स्थिती दिसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!