50 hajar anudan yojana list | सर्व जिल्ह्यांच्या 50 हजार अनुदान याद्या डाऊनलोड करा, एका क्लिकवर!

50 hajar anudan yojana list
50 hajar anudan yojana list

50 hajar anudan yojana list: महात्मा जोतिराव फुले योजनेअंतर्गत मागील सरकारने म्हणजेच ठाकरे सरकारने एकूण 31 लाख 73 हजार शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली होती. त्यानंतर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली होती.

50 hajar anudan प्रोत्साहन अनुदानाची 2 वर्षांपासून शेतकरी वाट पाहत आहे. परंतु, आता प्रतिक्षा संपलीच आहे. कारण 50 हजार अनुदानाची पहिली यादी 12 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 14 लाखांहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, दुसरी यादी लवकरच जाहीर होणार आहे. (50 hajar anudan yojana)

50 hajar anudan yojana maharashtra महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची पहिली यादी आली देखील असून, ‘केवायसी’ची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. यामधील दुसरी यादी 18 किंवा 19 ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात येईल. पहिल्या यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना 20 ऑक्टोबरला 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. (50 hajar anudan yojana list maharashtra)

पहिल्या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, कर्जखात्याचे व बचत खात्याचे पासबुक घेऊन संबंधित बँक शाखा किंवा ‘सीएससी’ सेंटर म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण (KYC) करुन घेतल्यानंतर 24 तासांच्या आत 50 हजार प्रोत्साहन अनुदान बॅंक खात्यात जमा होईल. (50 hajar anudan yadi)

याद्या कशा डाऊनलोड करायच्या?

शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की, 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाच्या याद्या कुठे पहायच्या? शेतकरी बांधवांनो यादी तुम्हाला CSC केंद्रावर पाहता येईल. यासाठी जवळच्या कोणत्याही CSC सेंटरला भेट द्या. जर तुम्हाला यादी डाऊनलोड करायची असेल, तर आम्ही खाली जिल्ह्यांच्या याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या याद्या डाऊनलोड करण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या समोर ‘येथे क्लिक करा’ यावर क्लिक करा.

(50 hajar anudan yojana yadi) 50 हजार अनुदान यादी डाऊनलोड करण्यासाठी जिल्हा निवडा आणि येथे क्लिक करा

बटणावर क्लिक करा


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!