आता रिअल इस्टेट एजंट बनण्यासाठी द्यावी लागणार ‘ही’ परीक्षा..

💁🏻‍♂️ रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी यापुढे (RERA) महारेराची परीक्षा पास करावी लागणार असून ही परीक्षा पास झाल्यानंतरच रिअल इस्टेट व्यवसायाचा परवाना मिळणार आहे. 1 मे 2023 पासून महारेराच्या (RERA) या नव्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे.

महाराष्ट्र रेराने (RERA) नुकतीच याबाबतची घोषणा करताना म्हटले की, जो या परीक्षेत पास होईल फक्त त्यालाच अधिकृतपणे एजंट म्हणून काम करता येणार आहे. राज्यात सध्या 37 हजार 746 प्रॉपर्टी एजंट आहेत. या रिअल इस्टेट एजंटसाठी परीक्षा देणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.

(Regulation and Development) महारेराने (RERA) प्रॉपर्टी (proparty) एजंटना प्रशिक्षण देण्याची योजना जाहीर केली असून एका परिपत्रकाद्वारे या योजनेची माहिती देण्यात आली आहे. रेराचा (RERA) नियम लागू झाल्यानंतर प्राधिकरण केवळ वैध योग्यता प्रमाणपत्र असलेल्या एजंटनाच त्याच्या पोर्टलवर अधिकृत रिअल इस्टेट एजंट म्हणून नोंदणी करण्याची परवानगी देणार आहे.

दरम्यान रेराने (Regulation and Development) (RERA) आपल्या परिपत्रकात नमूद केले की, रिअल इस्टेट एजंट हे प्रवर्तक आणि घर खरेदीदार यांच्यातील मध्यस्थ आहेत. त्यामुळे त्यांना नियामक फ्रेमवर्कच्या ज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी प्रशिक्षण देणे आवश्यक असून रिअल इस्टेट एजंट्सच्या कार्यपद्धतींमध्ये विशिष्ट स्तरावर सुसंगतता आणण्यासाठी, नियामक आणि कायदेशीर फ्रेमवर्क आणि पद्धतींचे ज्ञान आणि जागरूकता वाढवण्यासाठी आचारसंहितेची अंमलबजावणी आणि रिअल इस्टेट एजंट व्यावसायिकदृष्ट्या पात्र आहेत याची खात्री करण्यासाठी MahaRERA ने संपूर्ण महाराष्ट्रात रिअल इस्टेट एजंटसाठी मूलभूत रिअल इस्टेट एजंट प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना जाहीर केले आहे.

प्राधिकरणाने मागील दोन वर्षांमध्ये Proparty एजंट प्रशिक्षणासाठी मूलभूत अभ्यासक्रम विकसित केलेला आहे. त्यानुसार येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यापासून प्रशिक्षण प्रदाते ऑनलाइन, ऑफलाइन आणि हायब्रिड स्वरूपात प्रशिक्षण देतील. ही परीक्षा पास झाल्यावरच एजंटना अधिकृत एजंट म्हणून काम करता येणार आहे. (Regulation and Development)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!