‘ज्ञानवापी’ मशिदीत स्वस्तिक, त्रिशूळ, डमरू व कमळाची चिन्हे..

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीमध्ये 14 ते 16 मे दरम्यान झालेल्या सर्व्हेचा न्यायालयामध्ये सादर झालेला अहवाल लिक झाला आहे. ॲड. आयुक्त विशाल सिंह यांनी सादर केलेल्या 8 पानी अहवालाप्रमाणे, मशिदीतील कुंडाच्या मध्यभागी आढळलेल्या काळ्या रंगाच्या दगडाच्या आकृतीमध्ये कोणतेही छिद्र आढळले नसून पाईप घुसवण्यासाठीची जागाही आढळली नाही. मुस्लिम पक्ष हा दगड म्हणजे कारंजे असल्याचा दावा तर हिंदू पक्ष शिवलिंग असल्याचा दावा करत आहे. अडीच फुटांच्या या शिवलिंगाच्या आकाराच्या दगडावर कापल्याची निशाणी होती. त्यामध्ये सींक टाकले असता ते 63 सेमी खोल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. गोलाकार दगडाच्या पायाचा व्यास 4 फूट आहे.

सर्व्हे अहवालामधील मोठ्या गोष्टी

▪️मशिदीच्या आतमध्ये हत्तीची सोंड, त्रिशूळ, पान, घंट्या आढळल्या.

▪️मुख्य घुमटाखाली दक्षिणेकडे असलेल्या खांबावर स्वस्तिकचे चिन्ह आढळले.

▪️मशिदीच्या पहिल्या गेटवर तीन डमरूंचे चिन्ह आढळले.

▪️वायव्य दिशेला 15×15 फुटांचे तळघर असून, त्याच्यावर ढिगारा पडलेला होता. त्यामधील दगडांवर मंदिरासारख्या कलाकृती आढळल्या.

▪️तीन फूट खोल कुंड आढळला असून कुंडाच्या चारही बाजूंला तीस तोट्या लागल्या होत्या.

▪️कुंडाच्या मध्यभागी 6 फूट खोल विहिर आढळली तसेच विहिरीच्या मध्यभागी गोल दगडाची आकृती दिसली.

▪️बाहेर विराजमान नंदी व आत आढळलेल्या कुंडातील अंतर (ज्याच्या मध्यभागी एका बाजूला शिवलिंग स्थापन केले आहे असे मानले जाते) 83 फूट 3 इंच आहे.

▪️कुंडाच्या दगडाच्या गोलाकार आकृतीमध्ये (ज्याचा उल्लेख एका पक्षाने शिवलिंग म्हणून केला आहे) सिंक टाकल्यानंतर ते 63 सेमी खोल असल्याचे तपासामध्ये स्पष्ट झाले.

▪️दगडाच्या गोलाकार आकृतीच्या व्यास 4 फूट आढळला.

▪️गोलाकार दगडी आकृतीत (ज्याला एक पक्ष शिवलिंग व दुसरा पक्ष कारंजे असल्याचा दावा करत आहे) त्यात पाणी टाकण्यासाठी पाईप किंवा अन्य कोणतीही व्यवस्था दिसून आली नाही.

निलंबित आयुक्तांच्या अहवालामध्ये खंडीत देवी-देवतांचा उल्लेख

ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेच्या कामातून हटवण्यात आलेले माजी आयुक्त अजय मिश्रा यांनी बुधवारी आपला अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यांनी आपल्या 2 पानी अहवालात मशिदीच्या आत मध्ये शेष-नागाच्या आकृतीसह खंडीत देव-विग्रह, मंदिराचा ढिगारा, हिंदू देवी-देवता व कमळाची आकृती व शिलापट्टी आढळल्याचा दावा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!