PM Vaya Vandana Pension Scheme : मोदी सरकारची जबरदस्त योजना ! दरमहा मिळेल 9 हजारापेक्षा जास्त पेन्शन !

PM Vaya Vandana Pension Scheme : देशातील नागरिकांनाही केंद्र सरकार अनेक बचत योजना राबवत असून त्या योजना सर्वसामान्यांकरिता अत्यंत लाभदायक ठरत आहेत. अशीच सरकार तर्फे राबविण्यात येणारी एक योजना म्हणजे वय वंदना योजना होय…

PM Vaya Vandana Pension Scheme

निवृत्तीसाठी फायदेशीर योजना म्हणजे वय वंदन योजना (PM Vaya Vandana Pension Scheme)

निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांचे जीवन थोडे फार गुंतागुंतीचे होते. या काळामध्ये तुमच्याकरिता आर्थिक सुबत्ता खूप महत्त्वाची असते. आणि त्यामुळेच नागरिक त्यांच्या निवृत्तीनंतरचे पैसे अशा ठिकाणी गुंतवण्यचा प्रयत्न करतात जिथे त्यांना चांगला मोबदला मिळेल.

योग्य पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास पैसा तर सुरक्षित राहतोच शिवाय नियमित उत्पन्नही सुरू होते. केंद्र सरकारची वय वंदन योजना निवृत्तीसाठी फायदेशीर योजना म्हणजे वय वंदन योजना (PM Vaya Vandana Pension Scheme) सुद्धा अशीच आहे. या योजनेमध्ये पॉलिसीधारकाने गुंतवलेली मूळ रक्कम तर सुरक्षित राहतेच, शिवाय त्याबदल्यात त्यांना चांगला परतावा सुद्धा मिळतो.

मोदी सरकार या महिलांना देत आहे 6 हजार रुपये: जाणून घ्या सरकारच्या या योजनेबद्दल

या योजनेची अजून एक विशेष बाब म्हणजे या योजनेंतर्गत पती-पत्नी दोघेही त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना दरमहिना १८ हजार ५०० रुपयांची हमी पेन्शन सुद्धा मिळेल. या पेन्शन योजनेची अजून जबरदस्त गोष्ट म्हणजे 10 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला तुमची मूळ रक्कम सुद्धा परत मिळेल. चला तर मग या जाणून घ्या या योजनेबद्दलची सविस्तर माहिती.

आहे तरी काय PM वय वंदना योजना?

ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन मोदी सरकारने पीएम् वय वंदना निवृत्तीसाठी फायदेशीर योजना म्हणजे वय वंदन योजना (PM Vaya Vandana Pension Scheme) योजना सुरू केलेली असून सरकार ते LICद्वारे चालवले जाते.

केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना इतर योजनांच्या तुलनेत त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर जास्त लाभ मिळतो. या योजनेअंतर्गत 60 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक वयाचे लोक मासिक/वार्षिक पेन्शन निवडू शकतात. लक्षात ठेवा या योजनेत जास्तीत जास्त 15 लाखाची गुंतवणूक करू शकत.

पेन्शन किती मिळेल आणि त्यासाठी कुठे अर्ज करायचा?

पंतप्रधान वय वंदन योजनेअंतर्गत (PM Vaya Vandana Pension Scheme) 10 वर्षांकरिता मासिक पेन्शन योजनेवर 8 % दराने व्याज मिळते तर आणि जर का तुम्ही वार्षिक पेन्शन निवडली तर तुम्हाला 10 वर्षांकरिता 8.3 % दराने व्याज मिळेल. या योजनेकरिता तुम्हाला ऑनलाइन बरोबरच ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करता येईल.

सरकारच्या सर्व योजनांची माहिती घेण्यासाठी क्लिक करा.

जर तुम्हाला या योजनेकरिता अर्ज करायचा असल्यास तुम्ही LICच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकता. पॉलिसीधारकाला पेन्शनचा पहिला हप्ता हा 1 वर्ष, 6 महिने, 3 महिने किंवा त्यांनी रक्कम जमा केल्याच्या एका महिन्यानंतर प्राप्त होते. ही रक्कम त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर अवलंबून असेल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!