SIM Card Fraud: तुमच्या नावावर तुमच्या नकळत किती सिमकार्ड? 1, 2 कि त्यापेक्षा जास्त; अवघ्या मिनिटाभरात जाणून घ्या..

SIM Card Fraud : सध्याच्या काळात तुमच्या आधार नंबर अथवा तुमच्या कोणत्याही आयडीकार्डवरून फ्रॉड करणे अतिशय सोपे झालेले आहे. तुमच्या ओळखपत्राचा वापर करून फेक सिम कार्डची खरेदी करून त्या नंबरचा वापर फ्रॉड करण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळेच तर तुम्हाला खूपच सतर्क राहण्याची गरज आहे. जर दुसराच अनोळखी व्यक्ती तुमच्या नावावर चुकीच्या पद्घतीने घेतलेल्या सिम कार्डचा वापर फ्रॉड करण्यासाठी तर करत नाही ना? जर असं सारखं तुम्हाला वाटत असेल तर आम्ही दिलेली माहिती तुमच्या खूप उपयोगी पडेल. SIM cards registered under your Aadhaar Card

SIM Card Fraud

तुमच्या नावावर तुमच्या नकळत किती आणि कोणत्या कंपनीचे सीम कार्ड आहेत, हे जाणून घ्यायचे का? अथवा तुमच्या नावावर असलेले सीम कार्ड कुणी (SIM Card Fraud) दुसरीच व्यक्ती वापरत असेल आणि तुम्हाला याबद्दल माहितीच नसेल तर? यासारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पाहिजे असल्यास हा लेख नक्की वाचा…

सीम कार्ड म्हणजे काय? SIM Card Fraud

तर SIM या शब्दाचा अर्थ सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल (SIM Card) असा होतो. कोणत्याही मोबाईलमध्ये सीम कार्ड नसला तर त्या मोबाइलद्वारे कोणीही कॉल, मॅसेज किंवा इंटरनेट वापरू शकत नाही. (Wifi सुविधा वगळता)

फक्त मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन जाणून घेण्यासाठी क्लिक करा

सीम कार्डमध्ये तुमचे ठिकाण (mobile location track), मोबाइल नंबर, नेटवर्क बद्दलची माहिती, तुमची वैयक्तिक माहिती अश्या अनेक गोष्टी समाविष्ट असतात. भारत सरकारच्या दूरसंचार विभागातर्फे एक नवीन पोर्टल करण्यात आले असून या पोर्टलद्वारे तुम्हाला तुमच्या नावावर किती सिमकार्डची नोंदणी केलेली आहेत, या शिवाय तुमच्या नावावर एकापेक्षा अधिक सिमकार्ड सक्रिय असल्यास आणि तुम्हाला ते माहीत नाही किंवा तुम्ही ते सिम कार्ड वापरत नसल्यास (SIM Card Fraud) ते कसे बंद करावे, हे सुद्धा जाणून घेऊ शकता. ( How To Check All Sim Cards Registered On Your Name Check Details )

असे तपासा तुमच्या नावावर किती सिम कार्ड

सर्वात पहिले मोबाईल/कॉम्पुटरमध्ये https://tafcop.sancharsaathi.gov.in/telecomUser/loginPage?logout ही लिंक ओपन करा..

या वेबसाइटवर तुमच्या नावावर किती सिमकार्ड सक्रिय आहेत याची पूर्ण माहिती मिळेल.
जर कोणी दुसरीच व्यक्ती तुमच्या ओळखपत्राच्या आधारे तुमच्या नकळत बनावट सिम कार्ड वापरत (SIM Card Fraud) असेल तर त्याची सुद्धा संपूर्ण माहिती मिळेल.

असं करा चेक –

  • वरील लिंकद्वारे ओपन झालेल्या वेब पोर्टलवर तुम्हाला तुम्ही सध्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक टाका.
  • नंतर रिक्वेस्ट OTP या पर्यायावर क्लिक करा.
  • नंतर तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी बॉक्समध्ये टाकून व्हॅलिडेट या पर्यायावर क्लिक करा.
  • काही कारणास्तव मोबाईलवर OTP आला नसल्यास OTP पुन्हा पाठवा या पर्यायावर क्लिक करा.
  • व्हॅलिडेट पर्यायावरवर क्लिक केल्यास, तुम्हाला तुमच्या नावावर सक्रिय असलेल्या मोबाईल नंबरची एक यादी दिसेल.
  • तुम्ही वापरत असलेल्या मोबाईल नंबर व्यतिरिक्त तुमच्या वापरात नसलेले किंवा तुमच्या नकळत तुमच्या नावावर असलेले मोबाईल नंबर दिसल्यास तुम्हाला ते सिम कार्ड बंद करता येते.

या प्रकारे ब्लॉक करा तुमच्या नकळत तुमच्या नावावर घेतलेले सिम कार्ड

SIM Card Fraud

जर तुम्हाला वाटत असेल की, वेब पोर्टलवर दिसत असलेल्या नंबरपैकी एखादा नंबर तुमच्या नकळत घेतलेला आहे तर तुम्हाला त्या नंबर विषयीची रिपोर्ट करता येईल. यानंतर भारत सरकार त्या नंबर संबंधीची माहिती चेक करून त्या नंबरला ब्लॉक करेल. मात्र, यासाठी तुम्हाला त्याचा पाठपुरावा करावा लागेल. एका ओळखपत्रावर अधिकतम ९ सिम कार्ड जारी करण्यात येते. मात्र, काही राज्यात जसे की आसाम, जम्मू & काश्मीर, उत्तर पूर्व राज्यामध्ये एका ओळखपत्रावरून अधिकतम ६ सिम कार्ड देण्यात येतात.. (SIM Card Fraud)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!