‘या’ दोन मोबाईल नंबर्सपासून व्हा सावध.! अन्यथा बँक खाते होईल रिकामे; SBI ने दिला सतर्कतेचा इशारा!

भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना वेळो-वेळी फसवणुकीच्या घटनांबद्दल सतर्क ठेवत असते.

मागील काही वर्षांमध्ये बँकिंग व्यवस्थेमध्ये खूप मोठे बदल झाले असून सध्याच्या काळामध्ये नागरिक बँकेच्या शाखेत जाण्याऐवजी घरी बसून नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादींचा वापर करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मागील काही वर्षांमध्ये बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. फसवणुक करणारे गुन्हेगार वेग-वेगळ्या मार्गांनी लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा सतत प्रयत्न करत असतात. याबद्दल आपल्या SBI ने आपल्या 44 कोटी ग्राहकांना सतर्क करण्यासाठी अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे.

SBI बँकेने सायबर गुन्हेगारांच्या +91-8294710946 आणि +91-7362951973 या दोन क्रमांकांवरून येणाऱ्या कॉलपासून सावधान राहण्यास सांगितले आहे. मागील काही दिवसांपासून गुन्हेगार या 2 नंबरवरून कॉल करतात आणि लोकांना KYC अपडेट करण्यास सांगतात. त्यामुळे कोणत्याही ग्राहकांनी अशा प्रकारच्या कॉलच्या फंदामध्ये पडू नये आणि कोणत्याही प्रकारच्या फिशिंग लिंकवर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये, असे सांगितले आहे.

फसवणूक टाळण्यासाठी नेहमी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा…

👉🏻 जर कोणी तुम्हाला कॉल, एसएमएस किंवा ईमेलद्वारे KYC अपडेटची माहिती पाठवत असेल, तर अशा परिस्थितीत अशा प्रकारच्या कॉल मेसेजपासून सावध राहा.

👉🏻 तुमचा बँकिंग पासवर्ड वेळो-वेळी बदलत राहा.

👉🏻 SBI बँकेशी संपर्क साधण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या नंबरवर कॉल करा.

👉🏻 फसवणूक झालीच तर https://cybercrime.gov.in/ या वेबसाइटवर तुमची तक्रार नोंदवा.

‘या’ चुका करणे टाळाव्या

👉🏻 तुमचे पर्सनल डिटेल्स आणि बँक अकाउंट संबंधीची माहिती कोणाशीही शेअर करू नका

👉🏻 आपला पासवर्ड स्ट्राँग ठेवावा.

👉🏻 तुमच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI पिनचा पासवर्ड कुठेही लिहून ठेवू नये.

👉🏻 तुमचे पर्सनल डिटेल्स सोशल मीडियावर शेअर करणे टाळावे.

👉🏻 कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!