एकनाथ शिंदेंच्या गटात सामिल होण्यासाठी 50 कोटी रुपयांची ऑफर..
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणाऱ्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकनाथ शिंदेंच्या गटात सामिल होण्यासाठी 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनी केला आहे. माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे की, परवा फोरच्युनर गाडीत पैसे घेऊन आले होते, पण मी भद्रा मारुतीवर हाथ ठेवायला तयार आहे, मला 100 कोटी दिले तरीही शिवसेनेसोबत गद्दारी करणार नाही, असंही ते म्हणाले.
पडेगाव येथे संतप्त शिवसैनिकांनी बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांच्या फोटोला काळे फासले.शिवसेनेविरुद्ध बंडाचा बडगा उगारनार्या आमदारांविरुद्ध राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले असून, त्यांच्या कार्यालय तोडफोड करून बॅनर फाडले जात आहे, तर कुठे त्यांच्या फोटो काळे फासले जात आहे. मात्र औरंगाबादेतील शिवसैनिक शांत आहेत. याबद्दल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना पत्रकार परिषदेत विचारले असता, ते संतापून म्हणाले, मी जाऊन तोडफोड करू का? त्यानंतर लगेचच त्यांना सावरत आमदार अंबादास दानवे म्हणाले, की तालुका आणि जिल्ह्यात आमचे मेळावे सुरू आहेत. २२ जूनला क्रांती चौकात राज्यात सर्वात आधी आम्हीच बंडखोरांचा निषेध केला. त्यामुळे आम्ही शांत नाही. आमचे काम सुरूच आहे, असे ते म्हणाले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की सरकारने मार्च 2023 पर्यंत देशभरातील जमिनीच्या नोंदींचे डिजिटलायझेशन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. देशातील नागरिकांच्या आधारकार्डप्रमाणेच आता तुमच्या जमिनीचाही आधार क्रमांक दिला जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार तयारी करत आहे. वन नेशन, वन नोंदणी कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकार जमिनींसाठी एक अद्वितीय नोंदणीकृत क्रमांक जारी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकार…
काल दिनांक 27 जुलै 2022 रोजी राज्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही उपस्थित होते. या बैठकीमध्ये 13 महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून त्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासादायक ठरणाऱ्या निर्णयाचा सुद्धा समावेश आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ योजना जाहीर; पूरग्रस्त शेतकऱ्यांचा देखील समावेश राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत लाभ देण्याचा निर्णय या…
मेष : व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. त्याच्या काही व्यावसायिक योजना यशस्वी होऊ शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नाशी संबंधित निर्णय घेतला जाईल, ज्यामध्ये तुम्हाला मोठ्या व्यक्तींशी नक्कीच बोलावे लागेल. घरापासून दूर काम करणारे लोक आज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मिस करू शकतात आणि ते त्यांना भेटायला येऊ शकतात. जे लोक प्रेम जीवन जगत आहेत ते…
50 hajar anudan yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली होती. यामध्ये कर्जाची नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. 50 hajar anudan yojana 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानासाठी शेतकऱ्यांना अडीच…
PM Kusum Scheme: केंद्र सरकार पीएम कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौरऊर्जेचा वापर करून कमी खर्चात चांगले पीक घेता यावे म्हणून सोलर पंप बसवण्याची सुविधा पुरवत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर सौर पॅनेल बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी ९० टक्क्यांपर्यंत अनुदान Solar Pump Yojana Subsidy देण्यात येते. या योजनेचा खूप शेतकऱ्यांना लाभ झाला आहे….
Interest Free Education Loans : तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशात किंवा राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायाचा असेल तर तुम्हाला शैक्षणिक कर्ज मिळते. तुम्ही जर इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर तुमच्या कर्जावरील व्याजाची रक्कम भरण्याची संपूर्ण व्यवस्था सरकार तर्फे करण्यात येणार असून आता तुम्हाला ‘व्याज कसे भरायचे’ याची चिंता करण्याची गरज राहणार नाही.. Interest Free…