वीज पडण्यापूर्वी 15 मिनिटे अगोदर मिळेल सूचना; जीवितहानी टाळण्यासाठी ॲपचा होणार उपयोग..

येत्या काही दिवसामध्ये राज्यात मान्सूनचे आगमन होणार असून पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागा बरोबरच शहरी भगतासुद्धा वीज पडण्याच्या घटना घडतात व त्यमध्ये जीवित व वित्तहानीही होत असते. अनेक वेळेस पावसापासून बचाव करण्याकरिता लोकं झाडाचा आश्रय घेतात. मात्र झाडावर वीज पडण्याची जास्त शक्यता असते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी वीज पडण्यापूर्वी पंधरा मिनिट अगोदरची स्थिती दर्शवणारे ॲप उपलब्ध झाले असून भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाकडून दामिनी ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ॲपद्वारे वीज पडण्यापूर्वी पंधरा मिनिटं अगोदर स्थिती कळणार असल्यामुळे सुरक्षित स्थळ गाठणे शक्य होणार आहे. शिवाय त्यामुळे जिवित हानीही टाळता येणार आहे.

वीज पडून जिवित हानी होऊ नये याकरीता प्रतिबंधात्क उपाययोजना म्हणून दामिनी ॲप तयार करण्यात आले आहे. व प्ले स्टोअरद्वारे हे ॲप डाऊनलोड करता येणार आहे. सुरक्षात्मक उपाय-योजना म्हणून सर्वांसाठी हे ॲप फायदेशीर ठरणार आहे.

ॲप कसे काम करते?

दामिनी अ‍ॅप जीपीएस लोकेशन द्वारे काम करते. वीज पडण्याच्या १५ मिनिटापूर्वी या अ‍ॅपमध्ये तशी स्थिती दर्शविण्यात येते. आपण डाऊनलोड केलेल्या अ‍ॅपमध्ये आपल्या जवळपास वीज पडत असल्याचे दिसून आल्यास त्या ठिकाणापासून सुरक्षीतस्थळी जावे, तसेच यावेळी चुकून सुद्धा झाडाचा आश्रय घेऊ नये. शेतकऱ्यांना दामिनी ॲप फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे शेजाऱ्यांनी हे ॲप आपल्या सुरक्षिततेसाठी डाऊनलोड केल्यास त्यांनाही फायदा होणार आहे.

ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या अलर्टनुसार आवश्यकत त्या उपाययोजना करून जिवितहानी टाळणे सहज शक्य होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!