फक्त १५ दिवसातच दिसाल स्लिम; क्विक डाएट प्लॅन- वजन होईल कमी, दिवसभर वाटेल एनर्जेटिक..

जेव्हा जेव्हा महिला वजन कमी करण्यासाठी व्यायाम करण्याचा विचार करतात तेव्हा तेव्हा असे दिसून आले की दिवसभर घरातील कामात व्यस्त असलेल्या गृहिणींना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. नियमित व्यायामा-सोबतच चांगला आणि सकस आहार घेणेही खूप महत्त्वाचे आहे.

(Weight Lose Tips) वजन कमी करण्यासाठी ७०/३० नियमांचे पालन करायलाच हवे. वजन कमी करण्यासाठी केवळ व्यायामच नाही तर ७०% हेल्दी डाएटही करायला हवा. संतुलित आहाराचा तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नावर मोठा परिणाम होतो.

पोषणतज्ज्ञ इतु छाबरा यांनी वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही पौष्टिक आणि समृद्ध आहार घ्याल तेव्हा तेव्हा वजन आपोआपच कमी होईल. आपल्या आहारामध्ये उच्च प्रथिने व फायबरयुक्त आहाराचे सेवन केल्याने तुमचा संपूर्ण दिवस उत्साही वाटेल. ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्रेव्हिंग्ज होणार नाहीत. अशा आहाराची योजना केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर आपल्या शरीराला निरोगी पोषक तत्व देखील प्रदान करते.

👉🏻 सकाळी 6 ते 8 दरम्यान (Weight Lose Tips)

सकाळची सुरुवात नेहमी डिटॉक्स पाण्याने करावी. डिटॉक्स पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतील. सकाळच्या वेळेस ओवा किंवा मेथीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत राहते. ओवा रात्रभर पाण्यात भिजवून गाळून सकाळी प्यावे. तसेच मेथीचे पाणीही पिऊ शकता. हे पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यात खूप मदत होईल आणि ब्लोटिंग ॲसिडिटीच्या समस्येमध्ये ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल..

👉🏻 7:30 ते 8:00 दरम्यान (Weight Lose Tips)

सकाळी जेव्हा तुम्ही डिटॉक्स पाणी प्याल तेव्हा 30 मिनिटानंतर तुम्हाला 4 भिजवलेले बदाम खावे लागतील. ते रात्री दुधात किंवा पाण्यात भिजवून सकाळी सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यास खूप मदत होते.

👉🏻 8:30 वाजता (Weight Lose Tips)

नाश्त्यामध्ये 2 इडल्या किंवा 2 चपात्या, डाळी किंवा चटणीसह खाऊ शकता. शिवाय प्रत्येक दिवशी नाश्त्यासाठी 1 संत्री किंवा हंगामी फळ भाजी-पाल्याने भरलेल्या सँडविचचा समावेश करावा. नाश्त्यामध्ये मटर, बीन्स, पालक, ब्रोकोली इत्यादी भाज्यांचा समावेश करावा. या उच्च-प्रथिने (High Protein) असलेल्या भाज्या तुमचे स्नायू दुरुस्त व मजबूत करतात . यामुळे भूक नियंत्रित ठेवण्या-सोबतच शरीराला दिवसभर ऊर्जावान राहण्यास मदत होते.

👉🏻 11:30 वाजता (Weight Lose Tips)

सकाळी नाश्ता केल्यावर, किमान दोन-अडीच तासांच्या अंतराने एक ग्लास ताक किंवा एक वाटी पपई अथवा टरबूज खावा. या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे दिवसभर तुम्हाला हायड्रेट ठेवतील. तसेच, ताक तुमची पचनक्रिया मजबूत ठेवतो आणि भूक वाढवते.

👉🏻 1:30 वाजता (Weight Lose Tips)

दुपारच्या जेवणमध्ये नाचणी इडली, ओट्स उपमा आणि भाजांच्या समावेश करावा. दुपारच्या जेवणात सुद्धा मिक्स भाज्या आणि अर्धी वाटी डाळी आणि 2 चपात्या खाव्या. ओट्स किंवा उपमा खात असाल तर त्यात सुद्धा भाज्यांचा समावेश अवश्य कराव. तसेच हिरव्या भाज्या, कोशिंबीर आणि दही यांचे योग्य मिश्रण असावे. कमी कोलेस्टेरॉल आणि कॅलरी असलेले पौष्टिक समृध्द दुपारचे जेवण तुमचे पोट भरलेले ठेवते. वजन कमी करण्यास प्रभावी ठरते.

👉🏻 4:00 वाजता (Weight Lose Tips)

ग्रीन-टी पिल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते. वजन कमी करण्यासाठी ग्रीन-टी पिणे सुद्धा फायदेशीर असते. ग्रीन टी दिवसातून 2 वेळा घेणे आवश्यक आहे. ग्रीन-टी मध्ये पॉलीफेनॉल (फायटोकेमिकल्स) असते. जे शरीरातील अन्नाचे कॅलरीजमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला गती देतात आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

👉🏻 7: 30 वाजता (Weight Lose Tips)

रात्रीचे जेवण लवकर घ्यावे, कारण ते पचायला वेळ लागतो. तसेच रात्रीचे जेवण खूप हलके ठेवावे. रात्रीच्या जेवणात तुम्ही ब्राऊन राइसबरोबर भाज्या घेऊ शकता. खिचडी खाऊ शकता. रात्रीच्या जेवणात भाज्यांचा समावेश करा, किंवा चपाती आणि इतर कोणत्याही भाज्यां सह सॅलेडचा आहारामध्ये समावेश करा. जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागे राहणार असाल तर झोपण्याच्या काही वेळा-पूर्वी १/२ ग्लास हळदीचे दूध पिऊन झोपा. यामुळे चांगली झोप लागेल आणि आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरेल.

आहारतज्ज्ञ इतू चांगल्या आहारासोबत व्यायामाचाही सल्ला देतात. नियमितपणे चाला आणि वर्कआउटमध्ये कार्डिओचा समावेश करा. जेणेकरून कमीत कमी दिवसात तुम्ही वजन कमी करू शकाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!