देवगिरी एक्स्प्रेसवर 9 ते 10 जणांचा सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांनी सिग्नलला कापड बांधून थांबवली रेल्वे.

औरंगाबादवरून मुंबईला जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर 9 ते 10 दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली असून मध्यरात्री दौलताबाद-पोटूळ दरम्यान ही घटना घडली आहे.

दरोडेखोरांनी चक्क सिग्नलला कापड बांधून रेल्वे थांबवत नऊ ते दहा जणांच्या टोळीने लुटमार केल्याची माहिती मिळाली आहे. जवळपास 30 मिनिटे हा सगळा प्रकार सुरू होता. सध्या एक महिलेच्या गळ्यातील चैन आणि इतर वस्तू चोरल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे, रेल्वे डब्बा S5 पासून S9 वर दगडफेक करण्यात आली असून घटनास्थळी ॲम्बुलन्स देखील उभी होती दरम्यान हे दरोडेखोर ॲम्बुलन्समधून आले असल्याची माहिती मिळाली आहे.

5 एप्रिल रोजी अशाच प्रकारे नंदीग्राम एक्स्प्रेस आणि नांदेड मनमाड पॅसेंजर रेल्वे थांबवून लुटमार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर एक्सप्रेस पुन्हा रवाना करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!